28.2 C
Ratnagiri
Saturday, February 22, 2025

कांदळवन कार्यशाळेच्या खर्चाची चौकशी करा – पालकमंत्री उदय सामंत

कांदळवन व वनविभागाकडून नुकतेच एका आलिशान हॉटेलमध्ये...

रत्नागिरीत पोलिस दलात मोटारीसह ई-बाईक दाखल

पोलिसांनी आधुनिक उपकरणांचा उपयोग वापर जनतेसाठी करावा,...

रत्नागिरीतही आता हाऊसबोटी – पालकमंत्री उदय सामंत

काश्मीर आणि केरळनंतर रत्नागिरीतही हाऊसबोटी दाखल झाल्या...
HomeChiplunशिवसेना राख साचलेल्या निखाऱ्यासारखी फुंकर मारण्याची गरज : आ. भास्करशेठ जाधव

शिवसेना राख साचलेल्या निखाऱ्यासारखी फुंकर मारण्याची गरज : आ. भास्करशेठ जाधव

भास्कर जाधव यांनी मंत्री ना. उदय सामंत यांना टोला लगावला.

बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आज लचके तोडले जातातयत… शिवसेना ही राख आलेल्या निखाऱ्यासारखी झाली आहे. त्यावर फुंकर मारण्याची गरज निर्माण झाली असल्याचं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री आणि आमदार भास्करशेठ जाधव यांनी केलं आहे. रत्नागिरीमध्ये ते प्रसारम ाध्यमांशी बोलत होते. ना. उदय सामंत अलिकडे माझ्याविषयी बरं बोलतात, त्यांनी कायम चांगलं बोलावं असा टोला देखील आ. भास्करशेठ जाधव यांनी लगावला. राजन साळवी गेले म्हणून नाही तर ज्या पद्धतीने चारही बाजूने लचके तोडले जात आहेत, त्यावर चर्चा व्हाव्या लागतात. ती गरज असते असंही भास्कर जाधव म्हणाले. इतर पक्ष आणि शिवसेना यांची विचार करण्याची पद्धत निराळी आहे. शिवसेना पक्ष आदेशावर चालतो. उध्दव ठाकरे जो आदेश देतात त्याप्रमाणे नेते मंडळी पुढे काम करत असतात असे म्हणत भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या विचार पद्धतीवर बोट ठेवले.

नव्या दमाची फळी – बाळासाहेबांची सहानुभूती संपलेली नाही. त्यांचे विचार आजही सोबत आहेत असे भास्कर जाधव म्हणाले. कोकणात नव्या दमाची तरुणांची फळी उभी करण्याची गरज असल्याचे मतदेखील यावेळी भास्कर जाधव यांनी व्यक्त कैलं. याबाबत आमचे वरीष्ठ नेते पक्षाच्या धोरणांबाबत चर्चा करतच असतात. राजन साळवी गेले म्हणजे कोकण गेला असा अर्थ होत नाही, असेही आमदार भास्करशेठ जाधव म्हणाले.

सामंतांना टोला – पालकमंत्री ना. उदय सामंत हल्ली माझ्याबद्दल चांगल बोलत आहेत. त्यांनी कायम चांगलचं बोलावं असं म्हणत भास्कर जाधव यांनी मंत्री ना. उदय सामंत यांना टोला लगावला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक एक, लचका तोडला जात आहे. पक्षाला चारही बाजूनं घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासंदर्भात आमच्या चर्चा सुरु आहेत. आमच्या चर्चा कायम सुरु असतात असे जाधव म्हणाले. आमची चर्चेची पद्धती थोडी वेगळी आहे. आमचा पक्ष आदेशावर चालतो. पक्षप्रमुख हे आमच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करत असतात. साळवी गेले म्हणजे संपूर्ण रत्नागिरी जिल्हा गेला असे नाही, असेही जाधव म्हणाले.

विचार संपलेले नाहीत – बाळासाहेबांनी शिवसेना उभी करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. तसेच अनेकांनी प्राण देखील पणाला लावल्याचे भास्कर जाधव म्हणाले. आजही बाळासाहेबांची पुण्याई संपलेली नाही. त्यांनी दिलेले विचार संपलेले नाहीत. त्यांनी दिलेला हिंदुत्वाचा विचार, मराठी माणसाला दिलेला आधार दिल्याचे भास्कर जाधव म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular