31.4 C
Ratnagiri
Sunday, February 23, 2025

रत्नागिरी हायटेक बसस्थानकाचे ९० टक्के काम पूर्ण

पाच वर्ष रखडलेले हायटेक मुख्य बसस्थानकाचे काम...

मिनी महाबळेश्वरला उष्णतेच्या झळा, पारा ३७.८ अंश

दापोली तालुक्यात उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे....

वाटद एमआयडीसीसाठी पोलिस संरक्षणात मोजणी

वाटद एमआयडीसीसाठी भूमिअभिलेख, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ...
HomeRatnagiriपतितपावन मंदिराचा तूर्तास जीर्णोद्धार नको...

पतितपावन मंदिराचा तूर्तास जीर्णोद्धार नको…

सर्व वास्तू १०० वर्षांनंतरही दिमाखदार पद्धतीने उभ्या आहेत.

पतितपावन मंदिर व परिसरातील बांधकामे आणि त्या खालील जागा ही मुंबई उच्च न्यायालय रिसीव्हर यांच्या आदेशाने श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या वंशजांना देण्यात आली आहे. त्यामुळे श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा नातू म्हणून त्याची मालकी आदेशाप्रमाणे माझ्याकडे आहे. श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी उभ्या केलेल्या सर्व वास्तू आज १०० वर्षांनंतरही दर्जेदारपणे व दिमाखात उभ्या आहेत. त्यामुळे माझ्या मालकीच्या पतितपावन मंदिराच्या जीर्णोद्धाराची कोणतीही आवश्यकता नाही, असे पत्र भागोजीशेठ कीर यांचे नातू अंकुर अनंत कीर यांनी जिल्हाधिकारी, आमदार किरण सामंत, तालुका भंडारी समाज आदींना कळवले आहे. नातू अंकुर अनंत कीर (माटुंगा पश्चिम, मुंबई) यांनी हे पत्र दिले आहे. दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वखचनि रत्नागिरी येथे बांधलेल्या पतितपावन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे वृत्तपत्र आणि सोशल मीडियावरून समजले. दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विनंतीवरून १९२९ ला शेवडे यांच्याकडून गाडीतळ येथे २१ गुंठे जागा खरेदी केली.

त्यावर ७९ हजार ५७२ रुपये खर्च करून पहिले पतितपावन मंदिर व त्याच्या शेजारी १९३१ ला धर्मशाळा बांधली. भागोजीशेठ कीर हयात असेपर्यंत पतितपावन मंदिर दिवाबत्तीपासून सहभोजनादी सर्व खर्च भागोजीशेठ कीर त्यांच्या खासगी उत्पन्नातून करत होते. याची नोंद भागोजी बाळोजी कीर चॅरिटेबल ट्रस्टच्या ऑडिट अहवालात नमूद असल्याचे कीर यांनी पत्रात म्हटले आहे. श्रीमान भागोजीशेठ कीर यांचे २४ फेब्रुवारी १९४४ ला निधन झाले. त्यानंतर खासगी जमीन, मिळकती आणि मंदिर स्थळे १९४७ पासून मुंबई हायकोर्टाचे कोर्ट रिसीव्हर यांच्या ताब्यात होत्या. त्याचा निकाल २००४ ला लागला. या सर्व खासगी जमिनी मिळकती आणि मंदिर स्थळे त्यांच्या वंशजांच्या ताब्यात देण्यात आल्या. त्यानुसार पतितपावन मंदिर व परिसरातील बांधकामे आणि त्या खालील जागा ही मुंबई हायकोर्टाचे कोर्ट रिसीव्हर यांच्या आदेशाने श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या वंशजांना देण्यात आली आहे. त्यामुळे श्रीमान भागोजीशेठ कीर यांचा नातू म्हणून त्याची मालकी अंकूर कीर यांच्याकडे आहे. भागोजीशेठ यांनी उभ्या केलेल्या सर्व वास्तू १०० वर्षांनंतरही दिमाखदार पद्धतीने उभ्या आहेत. त्यामुळे माझ्या मालकीच्या पतितपावन मंदिरामध्ये जीर्णोद्धाराची आवश्यकता नाही, असे नातू कीर यांनी पत्रात म्हटले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular