28.2 C
Ratnagiri
Saturday, February 22, 2025

कांदळवन कार्यशाळेच्या खर्चाची चौकशी करा – पालकमंत्री उदय सामंत

कांदळवन व वनविभागाकडून नुकतेच एका आलिशान हॉटेलमध्ये...

रत्नागिरीत पोलिस दलात मोटारीसह ई-बाईक दाखल

पोलिसांनी आधुनिक उपकरणांचा उपयोग वापर जनतेसाठी करावा,...

रत्नागिरीतही आता हाऊसबोटी – पालकमंत्री उदय सामंत

काश्मीर आणि केरळनंतर रत्नागिरीतही हाऊसबोटी दाखल झाल्या...
HomeRatnagiriनाटे, रसाळगड, गोवा किल्ल्याला नवा साज - पुरातत्त्व विभाग

नाटे, रसाळगड, गोवा किल्ल्याला नवा साज – पुरातत्त्व विभाग

किल्ल्यांचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी निधीही दिलेला आहे.

राज्याच्या पुरातत्त्व खात्याने केंद्र आणि राज्य संरक्षित किल्ल्यांचे जतन व संवर्धन आणि किल्ल्यांचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी पावले उचललेली असून टप्प्याटप्प्याने निधीही दिलेला आहे. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील गोवा (हर्णे), नाटे, रसाळगड या तीन किल्ल्यांची कामे सुरू असून, त्यासाठी सुमारे २३ कोटी रुपये मंजूर आहेत पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली ही कामे हाती घेण्यात आली आहेत. पुढील दीड वर्षात ही कामे पूर्ण होतील, असे पुरातत्त्व विभागाकडून सांगण्यात आले. इतिहासाच्या पाऊलखुणा म्हणून जिल्ह्यातील गड, किल्ल्यांची ओळख आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या इतिहासाची साक्ष असलेल्या या किल्ल्यांना पर्यटनदृष्ट्या फारच महत्त्व आहे. कोकणातील मुसळधार पावसाचे तडाखे सहन करीत गेली अनेक वर्षे हे किल्ले तग धरून आहेत. यामध्ये काही सागरी किल्ल्यांचाही समावेश आहे. पावसाबरोबरच समुद्राच्या लाटांचे तडाखेही सहन करावे लागतात.

कोकणातील वास्तव्यावेळी काही किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांनी हजेरी लावल्याच्या नोंदीही आहेत. या किल्ल्यांचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाने जिल्ह्यातील सात किल्ले राज्य संरक्षित केले होते. त्यातील पूर्णगड, बाणकोट या दोन किल्ल्यांच्या सुशोभीकरणाची कामे पुरातत्व विभागाने पूर्ण केली आहेत. तिथे पर्यटकांचा राबताही वाढलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दापोलीतील गोवा किल्ला, नाटे, रसाळगड यांच्या दुरुस्तीची कामे पुरातत्त्व विभागाकडून हाती घेण्यात आली आहेत. हर्णै समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ल्यासमोरच असलेला भुईकोट म्हणजेच गोवा किल्ल्याची तटबंदी ढासळलेली आहे. या किल्ल्यासाठी शासनाने सहा कोटी ९२ लाख ७१ हजार रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे.

राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून हा निधी देण्यात आला आहे. या किल्ल्याच्या संरक्षक असलेली काळया पाषाणाची तटबंदी ढासळत चालली आहे. किल्ल्याचे बुरूज कोसळले असून, त्यांची दुरुस्ती आवश्यक होती. या राज्य संरक्षित स्मारकावर सामाजिक संस्था दायित्वांतर्गत पूर्णवेळ दोन पहारेकरीही नियुक्त केले गेले आहेत. त्याचबरोबर नाटे किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी आणि रसाळगडसाठी १० कोटी रुपये मंजूर आहेत. ही कामे पूर्ण होण्यासाठी दीड वर्ष लागेल.

RELATED ARTICLES

Most Popular