29.6 C
Ratnagiri
Saturday, February 22, 2025

आता वेध रविवारच्या सामन्याचे, चॅम्पियन्स करंडक

बांगलादेशला हरवून विजयी सलामी दिली असली तरी...

कामगिरी नियुक्तीने शाळांवर जाणार नाही, कंत्राटी शिक्षक संघटना

पुढील वर्षात कंत्राटी शिक्षकांना नियुक्तीबाबत हमी दिली...

प्रधानमंत्री घरकुलाचे १९ हजार ५२५ चे उद्दिष्ट – कीर्तीकिरण पूजार

प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत जिल्ह्याला १९...
HomeRajapurदीडशे गावांना 'हर घर जल'ची प्रतीक्षा, मार्चपर्यंत कामांना मुदतवाढ

दीडशे गावांना ‘हर घर जल’ची प्रतीक्षा, मार्चपर्यंत कामांना मुदतवाढ

ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे अंमलबजावणी केली जात आहे.

केंद्र शासनातर्फे हर घर जल देणारी जलजीवन मिशन योजना ही महत्त्वाकांक्षी योजना तालुक्यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे राबवली जात आहे. यामध्ये मंजूर झालेल्या ११२ पैकी अवघ्या तीन कोटींचा निधी खर्च झाला आहे. त्यातून तालुक्यातील ५० महसुली गावे हर घर जल म्हणून घोषित झाली आहेत. अद्यापही सुमारे दीडशे गावांना हर घर जल घोषित होण्याची प्रतीक्षा आहे. शासनाची जलजीवन मिशन ही महत्त्वाकांक्षी योजना गतवर्षी पूर्ण होणे अपेक्षित असताना त्याला मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे; मात्र पुढील दीड महिन्यात उर्वरित कामे पूर्ण होणे कठीण आहे. या योजनेसाठी तालुक्यामध्ये सर्वेक्षण होऊन आराखडा तयार करण्यात आला असून, त्याची ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे अंमलबजावणी केली जात आहे.

सप्टेंबर २०२४ पर्यंत जलजीवन मिशन योजना पूर्ण करण्याचा निर्धार शासनाने केला होता; मात्र निर्धारित कालावधीमध्ये कामे पूर्ण न झाल्याने मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तालुक्यामध्ये मंजूर झालेल्या ११२ कोटींच्या निधीतून २०० महसुली गावांमध्ये सध्या कामे सुरू आहेत. त्यापैकी ५० गावे हर घर जल म्हणून घोषित झाली आहेत; मात्र उर्वरित कालावधीत दीडशे गावांना हर घर जल म्हणून घोषित होण्यासाठी प्रशासनाला नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे लागणार आहे.

निधी नसल्याने अडचण – मार्चअखेरपर्यंत जलजीवन मिशन योजनेतील सर्व कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर आहे; मात्र गेल्या सुमारे सात-आठ महिन्यांपासून जलजीवन मिशन योजनेचा पुरेसा निधी आला नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. नळपाणी योजनेचे काम पूर्ण करायचे झाले तर त्यासाठी साहित्यखरेदीसह कामगारांच्या मजुरीसाठी पुरेसा पैसा हातामध्ये असणे गरजेचे आहे; मात्र निधीच नसेल तर हा खर्च कसा भागवायचा आणि कामे पूर्ण करायची कशी, असा सवाल एका ठेकेदाराने उपस्थित केला आहे.

हर घर जल घोषित झालेली गावे – शिवणेखुर्द, बुरंबेवाडी, बाकाळे, दसूरवाडी, पोकळेवाडी, चिखलगाव, पाजवेवाडी, निवेली, तेरवण, थोरलीवाडी, साखर, येरडव, गोठीवरे, कारवली, कशेळी-वरचीवाडी, दसूर, कोंभे, सागवे-पालये, खिणगिणी, जैतापूर-बाजारवाडी, सौंदळ-मुसलमानवाडी, नाणार-वाडीचिवारी, कुंभवडे-हरचलेवाडी, कुंभवडे, डोंगर-दत्तवाडी, मठखुर्द, सोलगाव, कुवेशी-तुळसुंदेवाडी, वाडावेत्ये, गोठणेदोनिवडे, वावूळवाडी, बारसू, भाबलेवाडी, निखरेवाडी, कोदवली-मांडवकरवाडी, मोगरे, केरावळे, सागवे जांभारी, देवीहसोळ, कोंडसरबुद्रुक, बेनगी, वडदहसोळ-खालचीवाडी, पळसमकरवाडी, करेल, डोंगर-मुसलमानवाडी, परटवली.

RELATED ARTICLES

Most Popular