27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeRatnagiriकुवारबाव येथील वर्तक कुटुंबीयांचा इको फेंड्रली बाप्पा

कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीयांचा इको फेंड्रली बाप्पा

या विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोना महामारीपासून बचाव करणाऱ्या कोव्हिड योद्धांचा देखावा व गणेश साकारला आहे.

प्रत्येक गणेशोत्सवामध्ये कुटुंबागणिक विविधता दिसून येते. घरगुती गणेशोत्सव सुद्धा काही जण खूप आकर्षक देखावे अथवा एखादे सूचक डेकोरेशन करून साजरे करताना दिसतात. कुवारबाव येथील वर्तक कुटुंबीय देखील प्रत्येक वर्षी वेगवेगळे इको फेंड्रली देखावे सादर करण्याचा प्रयत्न करत असतात.

सन २०२०-२१ वर्षापासून संपूर्ण जगाला कोव्हीड-१९ या विषाणूने हैराण केले वर्ष आहे. या जागतिक महामारीमध्ये कोरोनाचे नवीन व्हेरिएंट येऊन दररोज हजारो माणसे बाधित होऊन काही मृत्युमुखी देखील पडत आहेत. या विषाणूचा संसर्ग रोखायचा असेल तर लस घेणे, तसेच कोरोना निर्बंधासाठी आखून दिलेले सर्व नियम पाळणे गरजेचे आहे. या विषाणूच्या पार्श्वभूमीवर कोरोना महामारीपासून बचाव करणाऱ्या कोव्हिड योद्धांचा देखावा व गणेश साकारला आहे. ही मूर्ती पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण पुरक अशी असून, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संदेश देणारी मुर्ती व देखावा साकारलेला आहे. हा संपूर्ण देखावा १२ फूट उंचीचा असुन तो पूर्णतः पुठ्ठे, दोरा,  कागद,  गव्हाच्या चिकी यापासुन बनवून त्यावर नाचणी, केळीची पाने यांचा कलात्मकपणे वापर केलेला आहे.

द्वापार युगामध्ये जसे श्री कृष्णांने कालियामर्दनाचे रूप घेऊन संकट नष्ट केले, त्याप्रमाणे २१ व्या शतकामध्ये जगावर आलेलं कोरोनाचे संकट आणि वाढते संक्रमणाचा नाश करण्यासाठी या बाप्पाची स्थापना केलेली आहे. वर्तक कुटूंबियांचा वतीने कोरोना विषाणूच्या महामारीशी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, दोन हात करणाऱ्या कोरोना योद्धांना प्रतिकात्मकपणे गणेश रूपी दाखवणाऱ्या देखाव्यातून दैवत्व बहाल करण्यात आले आहे. संजय जगन्नाथ वर्तक, नंबर ‌‌‌‌-9421231963 / 8446274460 / 7972494878 या क्रमांकावर देखाव्याचे ऑनलाईन दर्शनही उपलब्ध आहे

RELATED ARTICLES

Most Popular