28.6 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRajapurपाचल व परिसरातील विज ग्राहक आक्रमक; अधिकाऱ्यांना धरले धारेवर !

पाचल व परिसरातील विज ग्राहक आक्रमक; अधिकाऱ्यांना धरले धारेवर !

दिवसातून पंधरा ते वीस वेळा विजपुरवठा खंडित होतं आहे.

राजापूर पूर्व भागात पाचल आणि परीसरात वारंवार होतं असलेल्या विजेच्या त्रासाला कंटाळून गेले कित्येक दिवसापासून विजग्राहक आक्रमक झाले होते. याचा उद्रेक आज सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राचल येथील विजग्राहकांनी आयोजित केलेल्या संभेत पहायला मिळाला. पाचल आणि परिसरातील जवळपास २५ ते ३० गावं गेल्या अनेक दिवसापासून विजेशिवाय अंधारात चाचपडत आहेत. दिवसातून पंधरा ते वीस वेळा विजपुरवठा खंडित होतं आहे. तर काही गावात चार चार दिवसं लाईटच नाही या त्रासाला कंटाळून याबाबत संबधित अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून याबाबत विचारणा करावी आणि जाब विचारावा अश्या प्रकारचा संदेश काल परीसरातील सोशल मीडियावर वायरल करण्यात आला होता. त्याप्रमाणे आज सोमवार दिनांक २६ रोजी ग्रामपंचायत पाचल इमारतीत ही सभा लावण्यात आली होती.

जवळपास तीस ते पस्तीस गावचे विजग्राहकांसोबत महावितरण विदयुत वीज वितरण कंपनीचे राजापूर तालुक्याचे उपकार्यकारी अभियंता मंगेश क्षीरसागर आणि पाचल उपशाखा कार्यकारी अभियंता संदीप बंडगर सहभागी झाले होते. यावेळी गेल्या काही दिवसापासून वारंवार खंडित होणारी वीज आणि त्यापासून होणारे नुकसान याबाबतचे प्रश्न उपस्तीत करून वीज ग्राहकांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होतें. दरवर्षी पाऊसं येतो दरवर्षी ठरलेली उत्तरे.. या उत्तरांना कंटाळून पाचल ग्रामपंचायत सभागृहात अनेक प्रशांना वाच्या फोडण्याचा प्रयत्न झाला. गेल्या काही दिवसापासून विजेअभावी रखडलेली कामे, झालेले नुकसान यावर विजग्राहकांनी कार्यकारी अभियंता यांना चांगलेच कोंडीत पकडलं. मात्र तरीदेखील या अभियंत्याची या अडचणीवर मात्र ठरलेली उत्तरे ऐकून पुन्हा एकदा विजग्राहकांनी यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

यावेळी अधिकार्याकडून येत्या दोन दिवसांत जामदा खोरे आणि पाचल विभागकरिता पर्यायी व्यवस्था म्हणून आजीवली येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून इलेक्ट्रिक सप्लायची सोय करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याशिवाय पाचल सब स्टेशनमध्ये येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीना. माहिती पत्रक दिले जाईल ज्यामध्ये नेमणूक वीज पुरवठा कर्मचारी यांची यादी व संपर्क क्रमांक देण्यात येईल. तसेच कायम स्वरुपी हेल्प लाईन नंबर उपलब्ध करून दिला जाईल असेही सांगितले. पुढे बोलताना त्यांनी जामदा खोरै करीता वेगळा विभाग (सब स्टेशन) निर्माण करण्याचा प्रस्ताव. ग्रामपंचायत पातळीवर तयार करून पुढे चाचपणी सुरू झाली पाहिजे अशी अशा व्यक्त केली. त्याशिवाय ३३ र्शी करिता पर्यायी व्यवस्था असावी म्हणून मागणी केली आहे. ज्यामध्ये खारेपाटण किंव्हा भांबेड येथून सप्लाय घ्यावा. जामदा खोरे करीता पाचल सब स्टेशन. येथून मूर खिंडीपर्यंत पर्यायी लाईन उपलब्ध झाली असून

त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, सौंदळ फीडर पाचल मुस्लिम वाडी येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गे पाचल बाजारपेठ करीता पर्यायी लाईनची जोडणी मंजुरी झाली असून लवकरच त्याचे काम सुरु करण्यात येईल, कर्मचारी वर्ग करीता साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल तसेच पर्यायी यंत्र सामुग्री पाचल सब स्टेशन मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल असे सांगण्यात आले. या सभेला पाचल सरपंच बाबालाल फरास, पांगरी सरपंच अमर जाधव, तळवडे सरपंच गायत्री साळवी, अजिवली सरपंच संजय राणे, मंडळ पाचल अधिकारी संजय पवार पाचंल माजी सरपंच अशोक सक्रे, माजी उपसरपंच किशोरभाई नारकर, बाजी विश्वासराव, सुरेश गुडेकर, अनिकेत सक्रे, तुषार पाचलकर, विलास नारकर, बाजी विश्वासराव, माजी सरपंच भास्कर सुतार, बाबा सुतार, पूजा शिगम सह अनेक ग्रामस्थांनी या चर्चेत सहभागी घेतला होता..

RELATED ARTICLES

Most Popular