28.2 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

प्रेयसीचा खून करून मृतदेह आंबा घाटात फेकून दिला

रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे गावातील तरुणीचा आंबा घाटात...

इंग्रजापेक्षाही क्रूर वागणूक देणाऱ्याऱ्यांना मराठ्यांची चपराक!

मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचे...

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...
HomeRatnagiriजिजाऊ संस्थेच्या मोफत मल्टिस्पेशलिटी रुग्णालयाचे उद्या रत्नागिरीत लोकार्पण

जिजाऊ संस्थेच्या मोफत मल्टिस्पेशलिटी रुग्णालयाचे उद्या रत्नागिरीत लोकार्पण

रत्नागिरीतील नाचणे रोडवरील आयटीआयजवळ प्रशस्त जागेत सुरू होत आहे.

जिजाऊ संस्थेच्या श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रूग्णालयाचा लोकार्पण सोहळा १ जून २०२५ रोजी रत्नागिरीमध्ये होत आहे. जिजाऊ संस्थेतर्फे सेवाभावी तत्वावर मोफत चालविले जाणारे रत्नागिरीतील पहिले व महाराष्ट्रातील हे तिसरे रूग्णालय आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र संचालित श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय रत्नागिरीतील नाचणे रोडवरील आयटीआयजवळ प्रशस्त जागेत सुरू होत असून सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानासहित तसेच तज्ञ डॉक्टर व आवश्यक असा प्रशिक्षित पॅरामेडिकल स्टाफसह ते जनतेच्या सेवेत रूजू होत आहे. दिनांक १ जून निलेश सांबरे यांच्या वडिलांच्या म्हणजे श्री भगवान महादेव सांबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हे रूग्णालय सुरू होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातील तसेच गरजू रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी हे रुग्णालय सुरू करण्यात येत असल्याचे जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्थेचे निलेश सांबरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विविध विभाग – बालरोग, हृयदरोग, कॅन्सर, जनरल सर्जरी, यूरॉलॉजी, स्त्रीरोग, नेत्रविकार, ऑर्थोपेडिक, न्यूरो आदी सर्व आजारांवर या रूग्णालयात उपचार होतील. तसेच पॅथॉलॉजी, डायग्नोसिस सुविधा या रूग्णालयात असेल. तसेच हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या मेडिकल स्टोअरमध्ये गोळ्या, औषधे देखील मोफत मिळणार आहेत.

सामाजिक जबाबदारी – आरोग्य व शिक्षण या सामान्य माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. माणसाला चांगल्या आरोग्य सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षण हे मिळालेच पाहिजे, यासाठी फक्त शासनावर अवलंबून राहून चालणार नाही तर आपली देखील सामाजिक जबाबदारी आहे. म्हणून आपण कमावलेल्या पैशातून हे प्रकल्प चालवले जावे व कुणीही व्यक्ती पैशाअभावी योग्य वैद्यकीय उपचारापासून वंचित राहता कामा नये, या भावनेतून हे रूग्णालय आपण सुरू करत आहोत, असे निलेश सांबरे यांना पत्रकारांना सांगितले.

४० रूग्णवाहिका – एवढेच नव्हे तर जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून कोकणातील पाचही जिल्ह्यासाठी ४० रुग्णवाहिका अहोरात्र धावत आहेत, दरवर्षी २०० पेक्षा जास्त रक्तदान शिबिरे, ५०० पेक्षा जास्त आरोग्य शिबिरे व ३०० पेक्षा जास्त नेत्र तपासणी शिबिरे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून घेतली जातात व हे कार्य अविरत चालूच आहे. सर्व उपक्रमांचा लाभ आत्तापर्यंत जवळपास ५ लाख लोकांना झाला आहे. तर ३ लाख पेक्षा जास्त लोकांना चष्मे वाटप करण्यात आले आहे, असेही निलेश सांबरे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular