26.4 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeChiplun'कुंभार्ली'तील अवजड वाहने बंद करा - शौकत मुकादम

‘कुंभार्ली’तील अवजड वाहने बंद करा – शौकत मुकादम

पावसाळ्यात घाट नादुरुस्त असल्याने तो धोकादायक बनला आहे.

कऱ्हाड-चिपळूण मार्गावरील कुंभार्ली घाट नादुरुस्त असल्याने अपघात होत असून, त्यात जीवितहानी होत आहे. पावसाळ्यात घाट नादुरुस्त असल्याने तो धोकादायक बनला आहे. त्यामुळे या घाटातून अवजड वाहने जात असल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने जाणे कठीण झाले आहे. त्यामुळे कुंभार्ली घाटात अवजड वाहने बंद करून अन्य मार्गाने त्याची वाहतूक सुरू करावी, अशी मागणी चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी केली आहे. कुंभार्ली घाटातील अवजड वाहतुकीवरून शौकत मुकादम म्हणाले, भोर घाटामध्ये ज्या पद्धतीने काम झाले आहे त्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेऊन कुंभार्ली घाटाची व अन्य दुरुस्ती तसेच रुंदीकरणाचे काम करण्यात यावे. कोकणामध्ये पावसाळ्यामध्ये दरड कोसळत आहेत. कुंभार्ली घाटात संरक्षण कठडा कोसळला आहे. पूर्वी हा घाट सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. आता तो राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. सध्या गुहागर-विजापूर या तीनपदरी रस्त्याचं काम अनेक वर्ष रखडले आहे.

सरकारचे धोरण काहीवेळेला चुकीचं होतं, अशी टीका शौकत मुकादम यांनी केली. गुहागर-विजापूर हा तीनपदरी हायवे शासनाने मंजूर केला होता. इतर ठिकाणी तीनपदरी आणि घाटामध्ये एकपदरी हा धंदा कुठला? त्यामुळे अजून किती लोकांचे बळी शासनामार्फत घेतले जाणार आहेत ? सध्या पावसाळ्यात घाटाची परिस्थिती बिकट आहे. या घाटातून वीस-पंचवीस टायर असलेली मोठी वाहने जातात. ती पावसाळ्यामध्ये बंद यावीत, मागणी करण्यात अशी मुकादम यांनी पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. या शिबिरात मुकादम यांनी कुंभार्ली घाटासह कोकणातील विविध विषयांवर उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

RELATED ARTICLES

Most Popular