24.3 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeChiplunमुसळधार पावसाचा चिपळूणला फटका…

मुसळधार पावसाचा चिपळूणला फटका…

गेले चार ते पाच दिवस तालुक्यात पावसाचा जोर कमालीचा वाढला आहे.

तालुक्यात मुसळधार पावसामुळे गेल्या दोन दिवसात मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये पिलवलीतर्फे सावर्डेत तीन गुरे वाहून गेली असून, आगवे लिबेवाडी येथे घरावर झाड पडून नुकसान झाले आहे. रामपूर परिसरात वीजखांब कोसळून १४ तास विद्युतपुरवठा बंद होता. तसेच सावर्डे-मुंढेतर्फे येथे शॉर्टसर्किटमुळे गुरांचा गोठा जळून खाक झाल्याने शेतकऱ्याचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. गेले चार ते पाच दिवस तालुक्यात पावसाचा जोर कमालीचा वाढला आहे. या पावसामुळे ठिकठिकाणी नुकसान झाले आहे. पिलवलीतर्फे सावर्डे येथील संतोष जानू पवार यांची एक दुभती गाय व दोन पाडे सोमवारी १६ जूनला वाहून गेले होते. त्यापैकी मृतावस्थेतील गायीचा शोध लागला असून, उर्वरित दोन गुरांचा शोध सुरू आहे. गुरूवारी १९ ला मुंढेतर्फे सावर्डे येथे वसंत रामा येडगे यांच्या गुरांच्या गोठ्याला शॉर्टसर्किटने आग लागल्याने एकच धावाधाव उडाली.

सुदैवाने, या आगीत गुरे अथवा मनुष्यहानी झालेली नाही; मात्र या आगीमुळे गुरांचा गोठा जळून खाक झाल्याने त्यामध्ये पवार यांचे सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे तर गुरूवारी सकाळी ६ वा. आगवे लिबेवाडी येथील शांताराम सोमा खांबे यांच्या घरावर झाड पडून सुमारे २६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कामथेखुर्द येथील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत संरक्षण भिंतीच्यावरील बाजूस मोठे दगड असून, सतत कोसळणाऱ्या पावसामुळे दगडालगत असणारी माती खाली येऊन जीवितहानी होण्याची निर्माण झाली आहे. रामपूर – घोणसरे – मार्गताम्हाणे परिसरात सोसाट्याचा वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसात चिवेली फाटाजवळ विद्युतवाहिनीवर मोठे झाड पडल्याने रामपूर परिसरातील अनेक गावांतील विद्युतपुरवठा तब्बल १४ तास बंद होता.

मार्गताम्हाणे येथे रवींद्र देवजी तांबिटकर यांचा गोठा पावसामुळे कोसळून नुकसान झाले. कात्रोळी कुंभारवाडी येथे विद्युतखांब जमीनदोस्त झाल्याची घटनाही घडली, तर उभळे येथेही विद्युतखांब पडून वीजवाहिन्या तुटल्या. तालुक्यातील परशुराम येथील हॉटेल रिव्हर व्ह्यू परिसरात मुख्य विद्युतवाहिनी तुटून पडल्याने काहींना विजेचा झटका बसल्याचा प्रकार गुरूवारी घडला. याबाबत येथील ग्रामस्थांनी लोटे येथील महावितरण कार्यालयाकडे संपर्क साधून देखील संबंधित यंत्रणांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही याशिवाय वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

RELATED ARTICLES

Most Popular