27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

सावर्डेत मत्स्यपालन, कुक्कूटपालन, कृषी पर्यटनाची शेतीला जोड

वडिलोपार्जित पारंपरिक शेतीला बाजारातील मागणीचा लाभ घेऊन...

चिपळुणात सदोष स्मार्ट मीटर बसवू नका…

स्थानिकांचा विरोध असतानाही अदानी पॉवर कंपनीने जुने...

चिपळूण घरकुलाचे स्वप्न जमीनदोस्त, तहसीलदारांकडे तक्रार

तालुक्यातील कादवड-सुतारवाडी येथील शासकीय योजनेतून मंजूर झालेल्या...
HomeChiplunआ. भास्कर जाधवांचा टायमिंग शॉट…. विधानसभा अध्यक्षांचे सूचक संकेत

आ. भास्कर जाधवांचा टायमिंग शॉट…. विधानसभा अध्यक्षांचे सूचक संकेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आम. भास्कर जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच संपूर्ण महाविकास आघाडीने पत्र देऊन देखील विरोधीपक्षनेतेपद देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याने मंगळवारी आम. भास्कर जाधव यांनी सभागृहात जबरदस्त टायमिंग शॉट मारला. सरन्यायाधीश भूषण गवई हे सत्कारासाठी विधीमंडळात येणार असल्याची संधी साधत आम. जाधवांनी सभागृहात अचानक मुद्दा उपस्थित केला. प्रश्नांची अक्षरशः सरबत्ती केली. विरोधी पक्षनेतेपद देणार आहात की नाही? ते सांगा, असे आ. भास्कर जाधव म्हणाले. अखेर अध्यक्षांनी प्रथा, परंपरेप्रमाणे कायद्याचा अभ्यास करून योग्य वेळी निर्णय घेईन, असे सूचक संकेत दिले आहेत. आता ते काय निर्णय देतात याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान सरन्यायाधिशांच्या सत्काराचे औचित्य साधत विरोधी पक्षाच्यावतीने त्यांना एक निवेदन देण्यात आले असून त्यामध्ये विरोधी पक्षनेतेपदाबाबतंची मागणी करण्यात आली आहे.

राज्याच्या विधानसभेत विरोधी पक्षामधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार जास्त आहेत. साहजिकच विरोधीपक्षनेतेपदावर या पक्षाचा हक्क आणि दावा देखील आहे. शिवसेना ठाकरे गटाने या पदासाठी आमदार भास्कर जाधव यांचे नाव निश्चित करून तसे पत्र विधानसभा अध्यक्ष तसेच सत्ताधारी पक्षाला दिलेले आहे. तसेच विरोधीपक्षातील घटक पक्ष असलेल्या. काँग्रेस, राष्ट्रवादी अर्थात महाविकास आघाडीने देखील आमदार भास्कर जाधव यांच्या नावाला पाठिंबा दिला असून त्या अनुषंगाने मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्षांची भेट घेऊन चचदिखील केली होती. परंतु सरकारचे दुसऱ्या अधिवेशनाला प्रारंभ होऊन दुसरा आठवडा सुरू झाला तरी अद्याप विरोधीपक्षनेते पदाचा निर्णय घेतला जात नसल्याने महाविकास आघाडीमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

आ. जाधवांचा टायमिंग शॉट – दरम्यान देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा मंगळवारी विधानसभेत सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने ते विधानसभेत येणार होते. हीच संधी साधत आमदार भास्कर जाधव यांनी सभागृहात अचानक विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा उपस्थित करत अध्यक्षांना टार्गेट केले. त्याला महाविकास आघाडीच्या आमदारांनीदेखील जोरदार साथ दिली. आम. जाधवांनी अशी काही प्रश्नांची सरबत्ती केली की अध्यक्ष व मुख्यमंत्रीदेखील अवाक् झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आम. भास्कर जाधव यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

निर्णय घेणार की नाही? – पण ऐकतील ते भास्कर जाधव कसले? ते आपल्या मुद्यावर ठाम राहिले, तुम्ही निर्णय घेणार आहात की नाही? कधी घेणार ते सांगा, अन्यथा देशाचे सरन्यायाधीश विधानसभेत येत आहेत. लोकशाहीची कशी हत्या येथे केली जात आहे हे आम्हाला सरन्यायाधीशांच्या समोर आणावे लागेल असे परखडपणे आम. भास्कर जाधव सभागृहात म्हणाले. अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आम. जाधवांची समजूत काढली. विरोधीपक्ष नेते पदाचा निर्णय माझा आहे, असे स्पष्ट करत मी सर्व कायदेशीर अभ्यास करून येथील प्रथा, परंपरेनुसार योग्यवेळी योग्य निर्णय घेईन, असे सूचक संकेत राहुल नार्वेकर यांनी यावेळी दिले. दिवसभर राजकीय वर्तुळात आ. भास्कर जाधवांच्या या टायमिंग शॉटची चर्चा सुरू होती.

RELATED ARTICLES

Most Popular