26.5 C
Ratnagiri
Thursday, July 31, 2025

महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणानेच दोघांचा मृत्यू

तालुक्यातील निवळी शिंदेवाडीकडे जाणाऱ्या पायवाटेवर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे...

वकिल असल्याचे सांगून लांज्यात एकाला घातला गंडा

वकील असल्याचे सांगून आसगे मांडवकरवाडी येथील एका...

कुंभार्ली घाटाची अकरा कोटी खर्चुनही दुरवस्थाच…

कुंभार्ली घाटरस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागील दोन वर्षांत ११...
HomeRatnagiri'ग्रीन प्रकल्प' मोठ्या परिश्रमाने आले, आता खुल्या दिलाने प्रकल्पांचे स्वागत करा  : ना. उदय सामंत

‘ग्रीन प्रकल्प’ मोठ्या परिश्रमाने आले, आता खुल्या दिलाने प्रकल्पांचे स्वागत करा  : ना. उदय सामंत

१०००० थेट नोकऱ्या निर्माण होतील तररोजगार निर्माण होतील.

“मागील २५ वर्षांपासून सातत्याने मला बहुमताने निवडून देणारे वाटद पंचक्रोशीतील नागरिक हे मी माझ्या परिवारातील मानवो, म्हणूनच त्यांना कणभरदेखील ‘तकलीफ’ होणार नाही याची मी सदैव काळजी घेत असतो. आताही वाटद पंचक्रोशीत येवू घातलेल्या प्रकल्पांमुळे त्यांना जराही त्रास होणार नाही याची मी पुरेपुर दक्षता घेणार आहे. एवढेच नव्हे तर तेथील जमिनीला सर्वाधिक दर मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील. वाटद परिसरातील सारे नागरिक अतिशय समजूतदार आहेत.. चांगल्या प्रकल्पांचे ते सदैव स्वागतच करतील.. तेथील माझ्या बांधवांनी व्यक्त केलेल्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.. आता त्यांनी सुहास्य वदनाने येणाऱ्या ‘स्वच्छ’ प्रकल्पांचे स्वागत करावे आणि विकासाच्या प्रगतीचे अग्रदूत व्हावे!” असे भावविभोर प्रतिपादन रत्नागिरीचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी केले. वाटद पंचक्रोशीतील नागरिकांच्या कोणकोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत त्याबाबत माहिती घेण्यासाठी ना. उदय सामंत यांची रविवार दि. २७ जुलै रोजी सायंकाळी विशेष मुलाखत घेण्यात आली. दिवसभर रत्नागिरी, गुहागर व खेड येथील दौरा करुन ते नुकतेच आले होते. अशाही स्थितीत त्यांनी मोठ्या उत्साहाने मुलाखत दिली.

प्रकल्प संपन्नतेसाठी! – “वाटद पंचक्रोशीतील नागरिकांच्या काही मागण्या आहेत, त्याबाबत काय?” असे विचारता ना. उदय सामंत यांनी उत्साहाने सांगितले की, “कालच म्हणजे २६ जुलै रोजी मी वाटद येथील जन प्रबोधन सभेत बोलताना माहिती दिली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे राहती घरे, मंदिरे तसेच मशिदी, सुपिक शेतजमीन, बागायत जमीन, पाणवठे हे सर्व वगळण्यात येईल. केवळ उपयोग नसणारी कातळ जमीन घेण्यात येईल, त्यामुळे कुणीही विस्थापित होण्याची भीती नाही. माझ्या बांधवांना विस्थापित करण्यासाठी हे प्रकल्प नव्हेत तर त्यांना संपन्न करण्यासाठी आहेत” असे त्यांनी सांगितले.

क्लिन व ग्रीन प्रकल्प – ना. उदय सामंत यांनी पुढे सांगितले की, “मुळात हे प्रकल्प पूर्णतः प्रदुषण विरहीत आहेत. हे सर्व प्रकल्प एकतर इंजिनिअरींग, इलेक्ट्रीकल किंवा इलेक्ट्रॉनिक्सचे असणार आहेत. त्यामुळे जराही प्रदुषण निर्माण होण्याचा प्रश्नच उदभवत नाही. हे सर्व प्रकल्प ‘क्लिन’ प्रकल्प म्हणून ओळखले जातात. त्यामुळे कुणी जराही काळजी करण्याचे कारण नाही. या प्रकल्पांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतात म्हणून आम्ही प्रयत्नपूर्वक व अथक परिश्रम घेऊन हे प्रकल्प येथे आणीत आहोत” असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रयत्नांची शिकस्त केली! – त्यांनी पुढे सांगितले, “१ नव्हे तर तब्बल ४ प्रकल्प या भुमीत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. अंबानी उद्योग समूहाला केंद्र सरकारने शस्त्र उत्पादनाचा परवाना दिला आहे. हा प्रकल्प सुमारे १० हजार कोर्टपिक्षा अधिक गुंतवणूकीचा असून त्यामुळे ५००० पेक्षा अधिक नोकऱ्या निर्माण होतील. हा प्रकल्प तो उद्योग समूह कोणत्याही राज्यात उभारु शकतो. खरे तर हा प्रकल्प आपल्या राज्यात यावा यासाठी विविध राज्यातील नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. त्यासाठी आम्हाला दिल्लीपर्यंत प्रयत्नांची शिकस्त करावी लागली.. असे प्रकल्प आपल्याकडे यावेत असे प्रत्येकाला वाटत असते” अशा शब्दात त्यांनी नेमकी वस्तुस्थिती कथन केली.

प्रचंड यातायात केली! – ना. उदय सामंत अतिशय तळमळीने व आपुलकीने बोलत होते. त्यांनी सांगितले, “असे ‘ग्रीन प्रकल्प’ व भरपूर रोजगार निर्मिती करणारे प्रकल्प आणण्यासाठी खूप खूप प्रयत्न करावे लागतात. येथील माझे सारे बांधव संपन्न व्हावेत या तळमळीने आम्ही ते प्रयत्न केले, त्या उद्योग समूहाला येथे प्रकल्प उभारण्यास राजी केले.. असे प्रकल्प आपण म्हणू तेव्हा येत नसतात.. ते येण्यासाठी प्रचंड यातायात करावी लागते.. आम्ही ते सर्व सायास केले म्हणूनच हा बडा उद्योग समूह येथे प्रकल्प सुरु करण्यास तयार झाला.. अशा स्थितीत आपण सर्वांनी आलेल्या संधीचा पुरेपूर लाभकरुन घ्यायला हवा” अशी मनोभावना त्यांनी व्यक्त केली.

तब्बल ४ प्रकल्प ! – ना. उदय सामंत सडेतोडपणे बोलत होते. त्यांनी सांगितले, “असे ४ ‘ग्रीन प्रकल्प’ या परिसरात आम्ही आणणार आहोत. दुसरा प्रकल्प ड्रोन निर्मिती प्रकल्पाचा आहे. सचिन तेंडूलकर यांच्या ओळखीचा वापर करून आम्ही त्या उद्योगपतींना येथे प्रकल्प उभारण्यास तयार केले. तिसरा प्रकल्प हा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये लागणाऱ्या सेमी कंडक्टरचा आहे. तर चौथा प्रकल्प हा सोलर एनर्जीमध्ये आवश्यक असणारी ‘सोलर पॅनल’ बनवणारा प्रकल्प असेल.. हे सर्व प्रकल्प १०० टक्के प्रदुषण नसलेले असेल आहेत, ते इंजिनिअरींग, इलेक्ट्रीकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प होत”.

१०००० थेट नोकऱ्या! –“वाटद दशक्रोशीतील सारे नागरिक हे माझे बांधव आहेत, माझ्या परिवारातील आहेत, माझ्या कुटुंबातील आहेत असेच मी मानतो. म्हणूनच त्यांना कणभर देखील ‘तकलीफ’ होऊ नये असाच माझा सदैव प्रयत्न राहतो. सहाजिकच किंचितही प्रदुषण करणारा प्रकल्प आम्ही येथे कदापि येऊ देणार नाही याची सर्वांनी पुरेपूर खात्री बाळगावी, असे ‘ग्रीन प्रकल्प’ आणण्यासाठी प्रचंड सायास करावे लागतात, तेव्हा ते आपणाकडे येतात.. आम्ही ते केले आणि म्हणून ते प्रकल्प आता येऊ घातले आहेत.. यामुळे सुमारे १०००० थेट नोकऱ्या निर्माण होतील तर कैक हजार अप्रत्यक्ष नोकऱ्या व रोजगार निर्माण होतील” असे त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले!

सर्वाधिक दर मिळणार ! – ना. उदय सामंत यांनी पुढे सांगितले, “हे सर्व प्रकल्प आणताना येथील माझ्या बांधवांना कोणताही त्रास होणार नाही याची आम्ही सदैव पुरेपूर काळजी घेऊ, तसेच माझ्या येथील बांधवांचा लाभ झाला पाहिजे, कोणतेही नुकसान होता कामा नये याची देखील आम्ही जीवापाड काळजी घेऊ. या प्रकल्पांसाठी जे जमिनी देतील त्या सर्वांच्या पदरात भरभक्कम लाभ पडेल हे निश्चित. त्यांना सर्वाधिक मोबदला देण्यासाठी आम्ही सारे कटीबध्द आहोत, त्यांच्या जमिनींना भरभक्कम दर देण्यात येईल याची आम्ही ग्वाही देत आहोत” अशा स्पष्ट व स्वच्छ शब्दात त्यांनी सारे सांगितले.

खुल्या दिलाने स्वागत करा ! – ना. उदय सामंत कळकळीने बोलत होते. त्यांनी सांगितले, “आज मी अधिकाराच्या जागी कार्यरत आहे. म्हणूनच यावेळी माझ्या बांधवांसाठी काहीतरी भरभक्कम करण्याचा केवळ मनसुबा नव्हे तर माझा निर्धार आहे. वाटद पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आलेल्या संधीचा लाभ घ्यावा आणि येणाऱ्या ‘ग्रीन प्रकल्पां’चे खुल्या दिलाने स्वागत करावे असे माझे सर्वांना मनःपूर्वक आवाहन आहे” अशा शब्दात त्यांनी येणाऱ्या प्रकल्पांचा लाभ घ्यावा असा नागरिकांना आपुलकीचा ‘सल्ला’ दिला.

RELATED ARTICLES

Most Popular