29.1 C
Ratnagiri
Tuesday, August 5, 2025

अकरावी प्रवेशाचा ऑनलाईन गोंधळ सुरूच विद्यार्थ्यांसह पालक धास्तावले

ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या...

कोकणनगरमध्ये ३१ हजारांचा गांजा जप्त…

शहरातील कोकणनगर ते प्रशांतनगर येथे पोलिस गस्त...

वाशिष्ठीत पतीचा मृतदेह सापडला, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

वाशिष्ठी नदीत उडी घेतलेल्या दांपत्यामधील नीलेश अहिरे...
HomeRatnagiriशैक्षणिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा अग्रेसर बनत असल्याचा अभिमान वाटतोः ना. सामंत

शैक्षणिकदृष्ट्या रत्नागिरी जिल्हा अग्रेसर बनत असल्याचा अभिमान वाटतोः ना. सामंत

अमृत महोत्सव समितीने १७५ वृक्ष लागवडीचा संकल्प केला

शैक्षणिक क्षेत्रात विविधं प्रयोग होत आहेत. त्यामुळे पूर्वीच्या काळातील शिक्षण आणि आताचे शिक्षण यात बराच मोठा फरक असून, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शासनाचे काम करत असताना रत्नागिरी जिल्हा हा शैक्षणिकदृष्ट्या सर्वच क्षेत्रात अत्याधुनिक स्वरूपासह प्रगत बनत आहे. काळाच्या ओघात रत्नागिरी जिल्हा हा भविष्यात शैक्षणिक हब बनणार असून, माझ्या रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कालानुरूप शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असून, रत्नागिरी जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या प्रगत होत असल्याचा अभिमान वाटत असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे उदयोगमंत्री नामदार डॉ. उदय स्वरूपा रविंद्र सामंत यांनी व्यक्त केले. ते रत्नागिरी तालुक्यातील’ आदर्श जीवन शिक्षण शाळा मालगुंड नंबर १ च्या शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षाच्या शनिवारी झालेल्या शुभारंभ कार्यक्रमात ते उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, रत्नागिरी हा नररत्नाची खाण असून या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणारे महनीय व्यक्तिमत्व झाले आहेत. त्यांच्या आदर्शाना अनुसरून कार्य करण्याची आज समाजाला गरज आहे. आदर्श जीवन शिक्षण शाळेला १७५ वर्षे होत आहेत, ही समस्त मालगुंडवासीयांना अभिमानाची बाब आहे.

मालगुंड येथे शनिवारी जीवन शिक्षण शाळा मालगुंड नंबर एक या शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या शुभारंभ कार्यक्रमाला नामदार उदय सामंत आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष, समिती सदस्य आणि शाळा मुख्याध्यापक आदींच्या वतीने सन्मानपूर्वक व यथोचित स्वागत करण्यात आले. उदय सामंत यांच्या हस्ते शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सव वर्षाच्या लोगोचे अनावरण आणि सरस्वती देवीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण दीप प्रज्वलन आणि शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ फलकाचे अनावरण करण्यात आले. या शुभारंभ कार्यक्रमात १७५ व्या शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मालगुंड येथील महिला भगिनींनी मराठमोळ्या पेहरावामध्ये १७५ दिव्यांनी नामदार उदय सामंत यांची ओवाळणी केली. या शुभारंभ महोत्सव कार्यक्रम ात शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या १७५ व्या वर्षानिमित्त शतकोत्तर अमृत महोत्सव समितीने १७५ वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन उर्फ आबा पाटील यांनी केले.

या शुभारंभ कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर नामदार उदय सामंत यांचे समवेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, मालगुंड येथील जीवन शिक्षण शाळेच्या शतकोत्तर अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष श्रीकांत मेहेंदळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरीश बापट, मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनिल तथा बंधू मयेकर, कवी केशवसुत स्मारक समितीचे अध्यक्ष गजानन पाटील, मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर, माजी सभापती. साधना साळवी, मालगुंड हायस्कूलचे मुख्याध्यापक बिपीन परकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबू म्हाप, तहसीलदार राजाराम म्हात्रे, गट विकास अधिकारी चेतन शिक्षण शेळके, प्राथमिक विभागाचे नरेंद्र गावंड आदींसह जीवन शिक्षण शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया शिर्के, सहशिक्षिका इंदुमती नाईक, शतकोत्तर अमृत महोत्सव समितीचे उपाध्यक्ष सदानंद केळकर, सचिव विलास राणे, कोषाध्यक्ष डॉ. संतोष केळकर, उपाध्यक्ष विशाल लिंगायत, आनंद लिंगायत, सौ. शुभदा मुळ्ये आदी मान्यवर तसेच विद्यार्थी शिक्षक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुरेख निवेदन वाटद कवठेवाडी शाळेचे मुख्याध्यापकं तथा प्रसिद्ध व्याख्यानकार माधव अंकलगे यांनी तर आभार प्रदर्शन जीवन शिक्षण शाळे शाळेच्या शतकोत्तर अमृत समि तीचे कोषाध्यक्ष डॉ. संतोष केळकर यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular