27.9 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

व्यापाऱ्यांवर गणेश प्रसन्न, २० कोटींची उलाढाल…

ऑनलाइन खरेदीचा कल वाढत असतानाही गणेशोत्सवानिमित्त रत्नागिरी,...

गणेशोत्सवासाठी गावी आलेला तरूण पुराच्या पाण्यात बेपत्ता

गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेला एक तरूण वहाळाला...

ग्राहक बनून आलेल्या ४ महिलांनी ज्वेलर्समधून मंगळसूत्र लांबविले

मंगळसूत्र खरेदी करण्याच्या बहाण्याने ज्वेलर्समध्ये आलेल्या ४...
HomeChiplunचिपळूणात वाशिष्ठी नदीने संयम दाखवला आणि नागरीकांनी निःश्वास सोडला

चिपळूणात वाशिष्ठी नदीने संयम दाखवला आणि नागरीकांनी निःश्वास सोडला

पाणी पातळी पाहता प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा अलर्ट केली होती.

शुक्रवारचा संपूर्ण दिवस पावसाने अक्षरशः गाजवला. चिपळूण शहरासह ग्रामीण भागाला देखील पावसाने झोडपून काढले. २४ तासात तब्बल १८१ मी.मी. इतका पाऊस पडला. कोळकेवाडी परिसरात चक्क २०० मी.मी. पाऊस पडला. त्यामुळे व्यापारी व नागरिकांची धडधड वाढली होती. परंतु वाशिष्ठी नदीने कमालीचा संयम दाखवला. इतका पाऊस पडून देखील वाशिष्ठी नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खालीच राहिली. त्यामुळे पुराचा शिरकाव अजिबात झाला नव्हता. सहाजिकच व्यापारी व नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. परंतु प्रशासन मात्र रात्रभर अलर्ट राहिले. प्रत्येक तासाची माहिती नागरिकांपर्यंत पोचवली जात होती. त्यामुळे सर्वजण निर्धास्त होते. सलग दोन वर्षे गाळ काढल्यामुळे चिपळूण पुरमुक्तीकडे वाटचाल करत असल्याची चर्चा या निमित्ताने ऐकण्यास मिळत आहे. गुरुवारी रात्रीपासून पावसाने दणक्यात सुरुवात केली होती. परंतु शुक्रवारी सकाळ पासून पावसाचा जोर वाढला आणि संध्याकाळी तर पावसाने रौद्ररूप धारण केले.

पावसाची तीव्रता इतकी भयानक होती की घरातून बाहेर पडणे कठीण बनले होते. एकूणच परिस्थिती बघता प्रशासन अलर्ट झाले. प्रांताधिकारी आकाश लिगाडे, मुख्याधिकारी विशाल भोसले, तहसीलदार प्रवीण लोकरे यांनी तात्काळ कोळकेवाडी धरण व महाजनकोशी संपर्क साधून परिस्थिती जाणून घेतली तसेच चिपळूण मधील परिस्थितीची माहिती त्यांना दिली त्यामुळे दोन्ही प्रशासनामध्ये समन्वय सुरू झाला होता. पावसाची तीव्रता, भरतीची वेळ आणि विद्युतनिर्मितीसाठी सुरू असलेली यंत्रणा या सर्वांची योग्य सांगड घालण्यासाठी दोन्ही बाजूकडून प्रयत्न सुरू करण्यात आले व त्यामध्ये प्रशासनाला चांगले यश देखील आले. दरम्यान वाशिष्ठी व शिवनदीची वाढणारी पाणी पातळी पाहता प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा अलर्ट केली होती. एनडीआरएफ चे पथक घेऊन मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रांताधिकारी लिगाडे, तहसीलदार लोकरे यांनी बाजारपुल परिसरात ठाण मांडले. पाणी पातळीवर बारकाईने लक्ष ठेवून प्रत्येक तासाची सद्यस्थितीत सोशील मीडियावरून नागरिकांना व व्यापाऱ्यांना देण्याचे काम प्रशासनाकडून केले जात होते. त्यामुळे व्यापारी व नागरिक निर्धास्त होते.

वाशिष्ठीची पाणी पातळी झपाट्याने वाढत होती. ३.४५ वरून पाणी पातळी थेट ४.८० पर्यंत पोहचली होती. वाशिष्ठीची इशारा पातळी ५.०० मीटर होती. त्यामुळे काही वेळेतच वाशिष्ठी इशारा पातळी ओलांडणार आणि पुराचे पाणी बाजारपेठेत घुसणार अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यातच भरतीची वेळ असल्याने सहाजिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु प्रशासनाने अत्यंत कुशलतेने परिस्थिती हाताळली. कोळकेवाडी येथील महाजनकोची यंत्रणा काहीकाळ बंद ठेवण्यात आली साहजिकच त्याचा परिणाम दिसून आला. वाशिष्ठीने कमालीचा संयम दाखवला. भरती असून देखील पाणी पातळी ४.८० पर्यंतच स्थिरावली आणि नंतर हळूहळू कमी होत गेली. त्यामुळे पुराचा धोका पूर्णपणे टळला. १८१ मी.मी. इतका प्रचंड पाऊस पडून देखील पुराच्या पाण्याचा शिरकाव अजिबात झाला नाही. हे प्रथमच घडले असून गेले दोन वर्षे काढण्यात आलेला गाळ व प्रशासनाची तत्परतेमुळे हा परिणाम जाणवत असल्याच्या प्रतिक्रिया या निमिताने ऐकण्यास मिळत आहेत.

दरड कोसळली, बत्ती गुल – प्रचंड पावसामुळे चिपळूण शहरातील कपिला पार्क या रहिवाशी संकुल मागे दरड कोसळली, दरडीची माती व दगड थेट विद्युत खांबावर अधळल्याने विद्युत खांब पूर्णपणे वाकला त्यामुळे विद्युत वाहीनी तुटून पडल्याने शहरातील बहुतांश भागाचा वीजपुरवठा खंडित झाला. विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती.

RELATED ARTICLES

Most Popular