27.5 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeChiplunचिपळूण - गुहागरमधील पशुधन खात्यातील रिक्त पदे भरा

चिपळूण – गुहागरमधील पशुधन खात्यातील रिक्त पदे भरा

पंधरा दिवसानंतर आयोजित बैठकीत तोडगा निघून उपाययोजना केल्या जाणार आहेत.

पशुधन खात्यातील चिपळूण व गुहागर तालुक्यातील रिक्त पदे असलेल्या राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी दोनच्या कार्यक्षेत्रातील पशुधन पशुवैद्यकीय सेवा पुरवण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी संघटना चिपळूण तालुक्यातर्फे “पदाधिकारी शुक्रवारी १५ ऑगस्ट रोजी शहरातील पशुवैद्यकीय दवाखान्या बाहेर उपोषणाला बसले होते. मनसेच्या नेत्यांच्या’ आक्रमक पवित्र्यामुळे अखेर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेत महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याशी उपोषणकर्त्यांची बैठक करून देऊन येथे पंधरा दिवसात रिक्त असलेल्या पदावर भरती होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकाऱ्यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिल्यानंतर पंधरा दिवसाच्या मुदती करता उपोषण स्थगित करण्यात आले आहे. याबाबतचे लेखी पत्र उपोषणकर्त्यांना अधिकाऱ्यांनी दिले. विविध मागण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी संघटनेच्यावतीने चिपळूण मधील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालया बाहेर १५ ऑगस्ट रोजी मनसे पदाधिकाऱ्यांनी उपोषण केले.

शेतकऱ्यांची होत असलेली नुकसानी व जनावरांच्या होत असलेल्या हाल अपेष्टा याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आक्रमक पवित्र्यानंतर पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी वटणीवर आले आहे. खात्यातील गैरसोयी बाबत येत्या पंधरा दिवसात ठोस निर्णय होणार आहे. महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे, पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्यासोबत मनसे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून या बैठकीत ठोस कार्यवाही होणार आहे. शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष उमेश लटके, तालुका अध्यक्ष सागर चिले, मनसेचे नेते प्रमोद गांधी, जितेंद्र चव्हाण यांच्या कडक भूमिकेमुळे प्रशासन जागेवर आले आहे. या मागणी करता महाराष्ट्र नवनिर्माण सेना शेतकरी संघटनेतर्फे गेली अनेक महिने पशुसंवर्धन खात्याकडे मागणी करण्यात येत होती. १६ जुलै २५ रोजी प्रत्यक्ष पत्रव्यवहार करून मागणी करण्यात आली होती. हे निवेदन तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना देखील देण्यात आले होते.

पशुसंवर्धन राहत्या कडून यादरम्यान काहीच उपाययोजना न झाल्याने शुक्रवारी मनसेचे कार्यकर्ते उपोषणाला बसले होते. मनसे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकारी मंडळी, थातूरमातूर उत्तर देत होते. अखेर पशुधन विभागाचे सहाय्यक उपायुक्त दत्तात्रय सोनावले यांनी मुंबई कार्यालयातील पशुधन विभागाचे मुंबई कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त श्री. कांबळे यांच्याशी मनसे नेते जितेंद्र चव्हाण यांचे दूरध्वनीवरून बोलणे करून दिले. या समाधानकारक चर्चेमुळे मनसेच्यावतीने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत पंधरा दिवसानंतर आयोजित बैठकीत तोडगा निघून उपाययोजना केल्या जाणार आहेत, अशा आशयाचे पत्र सहाय्यक ‘उपायुक्त डॉ. दत्तात्रय सोनावले यांनी सागर चिले यांना देऊन पाणी पिण्यास देऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी मनसे नेते प्रमोद गांधी, जितेंद्र चव्हाण, उमेश लटके, सागर चिले, नंदकुमार फडकले, जितेंद्र महाडिक, प्रथमेश खेतले, संदेश सुरवसे, मिलिंद कदम, गणेश भोंदे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular