27.3 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriपावसामुळे कोकण रेल्वे विस्कळीत अनेक गाड्यांना विलंब तर काही रद्द

पावसामुळे कोकण रेल्वे विस्कळीत अनेक गाड्यांना विलंब तर काही रद्द

काही गाड्यांच्या वेळापत्रकात आणि मार्गात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

मुंबई व उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने कोकण रेल्वेची वाहतूकही विस्कळीत झाली आहे. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांच्या वेळापत्रकात आणि मार्गात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २० ऑगस्ट २०२५ रोजी धावणाऱ्या १२०५१ मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस व १२०५२ मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आणि २१ ऑगस्ट रोजी सुटणारी २२२३० मडगाव-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस देखील रद्द केली आहे.

दरम्यान, ११००३ दादर-सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस जी बुधवारी पहाटे १२:०५ वाजता सुटणार होती, ती आता रात्री ११:०० वाजता सुटेल. प्रवासाच्या मार्गातही बदल करण्यात आले असून, १२६१९ लोकमान्य टिळक-मंगळुरू मत्स्यगंधा एक्सप्रेस पनवेलहून सुटेल, तर १०११५ वांद्रे-मडगाव एक्सप्रेस कामण रोडहून सुटेल. वांद्रे ते कामण रोडदरम्यानचा प्रवास रद्द करण्यात आला आहे. कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर यांनी प्रवाशांनी सहकार्य करावे, तसेच प्रवास सुरू करण्यापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा चौकशी केंद्रावर माहिती घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular