मालवणी मुलखात म्हाळाच्या कार्यक्रमांत गजालींना बहर आलाय. सध्या कुडाळ मालवण आणि सावंतवाडी विधानसभा मतदार संघात भाजपा विरुद्ध शिंदे सेना यांच्यात सुरु असलेला वाद मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. आम. निलेश राणेंना शिवसेनेत पाठविण्याची खेळी भाजपच्या अंगलट आल्याची खुलेआम चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे. मालवणी मुलखातील माणसात नेहमी बुद्धिमतेचे उन्मेष अढळतात . मालवणी मुलखातल्या माणसाला राजकारणाचे आणि त्यावर गजाली म ारण्याचे वेड येथील राजकीय पक्षांचा एकमेकांना विरोध हे मोठे वैशिष्ठ. तो विरोध, संघर्ष गेल्या कित्येक घटनेतून प्रकट होताना दिसला आहे. सर्व प्रांतिक आणि राष्ट्रीय पक्ष इथे आहेत. सध्या कुडाळ-मालवण, सावंतवाडी विधान सभा मतदार संघात भाजपा आणि शिंदे सेनेतील वाद हा मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक भाजपतील राणे समर्थकांनी शिंदे सेनेला पाठिंवा दिल्याने भाजपची झोप उडाली आहे. कुडाळ मध्ये भाजपाची वाताहत होत असल्याचे बोलत आहे. त्यामुळे ऐन म्हाळवसाच्या कार्यक्रमात गावागावातील लोक एकत्र येत असल्याने यावर गजाली चर्चा ऐकायला मिळत आहेत.
कुडाळ मध्ये राणेंची मोठी ताकद – कुडाळ- मालवणममध्ये भाजपानी मोठी ताकद होती. आम. निलेश राणे यांनी गेली पाच ते सहा वर्षे या मतदारसंघात अहोरात्र राबून पक्ष बांधणीचे काम केले. त्याचे फळ म्हणून लोकसभेच्या निवडणुकीत खा. नारायण राणे यांना या मतदार संघातून २७ हजारचं मताधिक्य मिळाले होते. आणि राणेंचा विजय सुकर झाला. त्यामुळे आम निलेश राणे यांचं म नोबल वाढल्याने त्यांनी कुडाळातून भाजपाकडे विधानसभेची तिकीट मागितली मागितल होती, अशी चर्चा ऐकायला मिळते.
महान कर्तबगार नेत्याची खेळी – आम निलेश राणे यांना भाजपकडून तिकीट मिळू नये आणि शिंदे गटात पाठविण्यासाठी भाजपच्या एका महान कर्तबगार नेत्याने दिल्ली पर्यंत आपली ताकद पणाला लावल्याची चर्चा ऐकायला मिळते. त्यामुळे अमितभाईंनी आपल्या एका मुंबई भेटीत खासदार नारायण राणे यांना भेटून निलेश राणेंना शिंदे यांच्या शिवसेना पक्षातून निवणूक लढवावी असे फर्मान केले हा निर्णय निलेश राणेंच्या समर्थकांना खटकला. त्यावेळी शिंदे सेनेची कुडाळ मध्ये कोणतीही ताकद नसताना निलेश राणेंना निवडून आणणे म्हणजे त्यांच्या समर्थकांपुढे आव्हान उभे राहिले. निलेश राणेंच्या उमेदवारीची खाट त्या भाजपच्या कर्तबगार महोदयांनी टाकली की काय? असा प्रश्न अवघ्या मालवणी मुलखात गावोगाव विचारला जाऊ लागला असून त्याच्या चविष्ट गजाली आजही रंगत आहेत.
निलेश राणेंना भाजपने पाडले तोंडघशी – काही मालवणी बुजुर्ग माणसे म्हणतात, लोकसभेच्या निवडणुकीत कुडाळ, मालवणमधील मतदारांनी खा. नारायण राणे यांच्या ‘कमळ’ या निशाणीला मते देऊन २७ हजारांचे घसघशीत मताधिक दिलेले आहे. मग भाजपाने निलेश राणेंना शिवसेनेतून लढविण्याचे का सुचविले, असा सवाल आजही उपस्थित केला जातो.
घराणे शाही हा मुद्दा निमित्त – यावेळी राणेंच्या घराणे शाहीचा मुद्दा पुढे आणला गेला. राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या दहा ते बारा घराण्यातील मुला-बाळांना आणि नातलगांना उमेदवारी देऊन भाजपने घराणेशाहीचा मुद्दा गौण ठरविला आहे. त्यामुळे कथित घराणेशाहीचा सांगण्यात येणारे कारण हे निव्वळ कांगावा असावा असे सरांस बोलले जात आहे. त्यामुळे भाजपच्या कर्तबगार नेत्याची निलेश राणे यांच्या विरोधातील खेळी यशस्वी झाल्याची चर्चा होऊ लागली..
जुन्या आठवानींना उजाळा – म्हाळाच्या निमित्ताने आता मालवणी मुलखात जुन्या आठवानींना उजाळा दिला जात आहे. आमदार निलेश राणे यांनी राजकारणातून अचानक निवृत्ती घेत असल्याची घोषणा दोन वार्गापूर्वी दसऱ्यांच्य दिवशी केली होती तत्कालीन पालकमंत्र्यांच्या एकाकी कारभारामुळे निलेश राणेंनी हा निर्णय घेतल्याची चर्चा तेव्हा रंगली होती. त्यावेळी भाजपतील अंतर्गत बाद चव्हाट्यावर आला होता. त्यातून कोकणात भाजपा कार्यकत्यामध्येही संभ्रमावस्था निर्माण चाली होती. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मध्यस्थी करीत वाद मिटवला होता ही आठवण आजही काढली जाते.
भाजपा आणि शिंदे गटात मोठा संघर्ष – सध्या कुडाळ आणि सांवंतवाडी मतदार संघात भाजपा आणि शिंदे गटात मोठा संघर्ष सुरु आहे. या दोन्ही मतदार संघात जे भाजपात राणे समर्थक आहेत. ते शिंदे सेनेचे काम करतात, असा आरोप भाजपाकडून होत आहे. त्यामुळे राणे समर्थांकावर म ोठी कारवाई करण्यात आली आहे. जर का त्यावेळी आम. निलेश राणे यांना भाजपातून उमेदवारी दिली असती त्तर तर ते भाजपात राहून पक्ष त्यांनी वाढविला असता. पण त्या कर्तबगार नेत्याने निलेश राणेंना शिवसेनेत पाठविण्याची खेळी भाजपच्या अंगलट आल्याची खुलेआम चर्चा ऐकायला मिळत आहे.
गजालींना आला बहर – मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे हे शिवसेनेत का गेले? त्यात भाजपच्या कुणा महान कर्तबगार नेत्याचा हात आहे की काय ? त्याने दिल्लीच्या नेत्यांचे कान फुंकून आम. निलेश राणे यांना पक्षाबाहेर काढण्याचा गेम केला की काय? ही खेळी आता भाजपच्या चांगलीच अंगलट आली असल्याची जोरदार चर्चा आता मालवणी मुलुखात सुरु झाली असून सध्या म्हाळाच्या कार्यक्रमांत गजालींना बहर आला आहे.

