लंडनमधील रवींद्रनाथ टागोर ज्या घरामध्ये राहत होते, ती इमारत आता विक्रीसाठी तयार झाली असून, भारताचे ऐतिहासिक महत्त्व दर्शवणाऱ्या या इमारतीची किंमत भारतीय चलनानुसार २७.३ कोटी रुपयांमध्ये निश्चित केली गेली आहे. अनेकानी मालमत्तेची किंमती आणि लंडनमध्ये घर ज्या ठिकाणी स्थित आहे, हे पाहून ही किंमत फारच कमी असल्याचे म्हटले आहे.
रवींद्रनाथ टागोर १९१२ साली काही महिन्यांसाठी उत्तर लंडनमधील हॅम्पस्टेड हीथ येथील ब्लू प्लाक नावाच्या इमारतीत वास्तव्यास होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०१५ मध्ये केलेल्या लंडनच्या पहिल्या दौऱ्या दरम्यान म्हणाल्या होत्या कि, ज्या घरी रवींद्रनाथ टागोर राहत होते, आमचे सरकार ते घर खरेदी करण्यासाठी उत्सुक आहे. टागोर हे आमचा अभिमान आहेत आणि ही एक खासगी मालमत्ता असल्याने, मी माझ्या उच्चायुक्तना याबाबत विचारणा केली होती कि, आपण या इमारतीसाठी सौदा करू शकतो का! परंतु, त्यावेळी ही मालमत्ता विकली जाण्याची काही शक्यता नव्हती, परंतु, आता त्याची किंमत निश्चित करण्यात आली आहे. टागोरांचे घर खरेदी करण्यासाठी पश्चिम बंगाल आणि राज्य सरकारने उत्सुकता दाखवल्यानंतर भारतीय वंशाचे ब्रिटीश उद्योगपती स्वराज पॉल यांना प्रचंड आनंद झाला होता, अगदी त्यांनी समिती नेमली तर त्याचा सदस्य व्हायची इच्छा देखील व्यक्त केली आहे.
या घरावर निळ्या रंगाचा फलक लावण्यात आलेला असून प्रसिद्ध भारतीय कवी रवींद्रनाथ टागोर येथे राहत असत, असे त्यावर नमूद केलेले आहे. लंडन कंट्री कौन्सिलने हा फलक लावला होता. टागोर यांच्याशिवाय, टिळक, महात्मा गांधी, इतर अनेक भारतीयांची नावे असलेले निळे फलक लंडनमध्ये पहायला मिळत आहेत.