प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यात दि. २६ सप्टेंबर ते दि. ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत मेघगर्जनेसह, वादळीवाऱ्यासह मुसळधार ते अतिम सळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आपल्या जीवित व मालमत्तेची काळजी घ्यावी, सतर्कता बाळगावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे. दि. २६सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील काही भागात मेघगर्जनेसह व वादळीवाऱ्यासह (ताशी ३० ते ४० किमी प्रती तास) पर्जन्यमान होण्याची शक्यता आहेः (यलो अलर्ट) दिः २७ सप्टेंबर व २८ सप्टेंबर रोजी जिल्हयातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. (ऑरेंज अलर्ट) दि. २९ व ३० सप्टेंबर रोजी जिल्हयातील काही भागात मुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. (यलो अलर्ट). या कालावधीत विजा चमकत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेण्यात यावी.
कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निंयंक्षण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी ०२३५२-२२६२४८/२२२२३३, व्हाटसअप ७०५७२२२२३३, जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष ०२३५२-२२२२२२, पोलीस टोल फ्री हेल्पलाईन ११२, जिल्हा रुग्णालय, रत्नागिरी – ०२३५२- २२२३६३, महावितरण, रत्नागिरी नियंत्रण कक्ष ७८७५७६५०१८, तहसिल कार्यालय रत्नागिरी ०२३५२-२२३१२७, तहसिल कार्यालय लांजा ०२३५१-२३००२४, तहसिल कार्यालय राजापूर २२२०२७, तहसिल कार्यालय संगम `श्वर ०२३५४-२६००२४, तहसिल कार्यालय चिपळूण ०२३५५-२६३०३१, तहसिल कार्यालय दापोली तहसिल ०२३५८-२८२०३६ कार्यालय गुहागर २५२०४४ / ९६७३२५.२०४४, तहसिल कार्यालय खेड ०२३५६-०२३५९-२४०२३७, कार्यालय मंडणगड तहसिल ०२३५०-२२५२३६. किंवा हवामान खात्याच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.