26.4 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeSindhudurgतळकोकणात चक्रीवादळाने हाहाकार ! धुळीचे लोट पाहून गावकरी अचंबित

तळकोकणात चक्रीवादळाने हाहाकार ! धुळीचे लोट पाहून गावकरी अचंबित

घरांवरील तसेच जनावरांच्या गोठ्यांवरील पत्रे उडून गेले असून भातशेती आडवी झाली आहे.

तळकोकणात सहयाद्रीच्या पायथ्याशी माणगाव खोऱ्यात मंगळवारी सकाळी अचानक चक्रीवादळाचा झंझावात पहायला मिळाला. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, त्यामुळे धुळीचे उसळलेले उंचच उंच लोट पाहून गावकरी अचंबित झाले. ‘वादळान माका उचलल्यासारखा वाटला’ अशा शब्दांत एका गावकऱ्याने त्याचे वर्णन केले. अवघ्या १५ मिनीटांत या वादळाने माणगाव खोऱ्यातील कुडाळ तालुक्यातील निवजे गावात हाहाकार माजवला. अनेक घरांवरील तसेच जनावरांच्या गोठ्यांवरील पत्रे उडून गेले असून भातशेती आडवी झाली आहे. ‘एखादी रेल्वे सुसाट धावत जाताना जसा आवाज येतो तसा आवाज ऐकू आला…. तो ऐकून आम्ही घाबरलो. काहीही कळत नव्हतं. खाली बसलो, अशा प्रतिक्रिया गावकऱ्यांनी दिल्या आहेत.  यावरून वादळाच्या तीव्रतेची कल्पना करता येते. याबाबतचे अधिक वृत्त असे की, मंगळवारी सकाळी ९.३० – ९.४५ वा. च्या सुमारास या अवघ्या १५ मिनीटांत कुडाळ तालुक्यातील निवजे गावात वादळानें हाहाकार माजवला. या वादळाचा तडाखा इतका मोठा होता की, धुळीचे मोठमोठे उसळणारे लोट पाहून गावकरी अचंबित झाले. वाऱ्यानं अनेक घरांवरील छपरे उडून गेली. गावातील भातशेती संपूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

संसार उघड्यावर – या चक्रीवादळामुळे निवजे गावातील अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रसाद पांडुरंग नाईक, संदीप दशरथ नाईक, कृष्णा रामचंद्र नाईक आणि प्रदीप गंगाराम राऊळ या ग्राम स्थांच्या घरावरील पत्रे उडून गेले असून आला आहे. त्याचप्रमाणे जनावरांच्या वाडा/गोठा यांच्यावरील छप्परदेखील उडून गेले आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

भातशेती पूर्ण आडवी – अवघ्या १५ मिनीटांत या वादळाने वाट लावली. या भागातील शेतीचे अपरिमित नुकसान झाले असून उभी भातशेती पूर्णपणे आडवी झाल्याचे दिसत आहे. काहीजणांची भातशेती पाण्याखाली गेली आहे. या चक्रीवादळामुळे घरकुल योजनेतून उभारलेल्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. घरांवरील छप्पर उडून गेले आहे. तर काही घरांच्या खिडक्यांचे, दरवाजांचे रेजे तुटले आहेत. सुदैवाने जनावरे किंवा व्यक्ती यापैकी कोणीही जखमी झालेले नाही.

जोरदार पाऊस – सिंधुदुर्गात गेल्या आठवडाभर जोरदार पाऊस कोसळत आहे. कुडाळ तालुक्यालाही पावसाने दोन दिवस चांगलेच झोडपले आहे. सोमवारी पावसाचा ज़ोर मोठ्या प्रमाणावर होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. होते.

सह्याद्रीच्या पायथ्याशी वादळ – या पावसामुळे होत असलेले नुकसान कमी म्हणून की काय मंगळवारी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास अचानक सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या माणगाव खोऱ्यात अचानक चक्रीवादळ घोंगावले. यामुळे कुडाळ तालुक्यातील निवजे गावात हाहाकार उडाला. पावसाबरोबरच अचानक चक्रीवादळ आल्यामुळे ग्रामस्थांम ध्ये भीतीचे वातावरण पसरले. चक्रीवादळाचा तडाखा एवढा जबरदस्त होता की, निवजे गावातील कृष्णा राम चंद्र नाईक, प्रसाद पांडुरंग नामनाईक, प्रदीप गंगाराम राऊळ आणि संदीप दशरथ नामनाईक, या ग्रामस्थांच्या घरांचे व वाड्यांवरील पत्रे उडून गेले. ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, उभी भातशेती पूर्णपणे आडवी झाली आहे.

मोठा धोका टळला – प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत या गावात काही घरे बांधण्यात आली आहेत. या घरांचे या वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. मात्र या घरांमध्ये अद्यापही कोणीही राहायला गेलेले नाही. लाभार्थी नामनाईक यांच्या घरकुलचे काम पूर्ण झाले असून ते येत्या २ दिवसांतच राहायला जाणार होते. मात्र त्याआधीच हा प्रकार घडल्याने मोठा धोका टळला, ही देवाचीच कृपा मानायची, असे त्यांनी सांगितले.

प्रचंड वेगाने वारे – या वादळाचा वेग इतका प्रचंड होता की, नामनाईक यांच्या घरावरील फॅब्रिकचे मोठमोठे पत्रे त्या घरापासून सुमारे एक ते दीड किलोमीटर अंतरावर फेकले गेले. एका शेतकऱ्याच्या गोठ्यातील गुरे गोठ्यात बांधंलेली असताना छप्पर जमीनदोस्त झाले. सुदैवाने तेथील गुरांना कोणताही धोका पोहोचला नाही. मात्र गोठ्याचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळी तहसीलदार वीरसिंग वसावे, गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी भेट देऊन पाहणी केली. दिवसाउजेडी हे चक्रीवादळ झाले. त्याचा वेग आणि तडाखा पाहून सारे गावकरी अचंबित झाले. जर हे चक्रीवादळ रात्रीच्यावेळी झाले असते तर किती हानी झाली असती याची कल्पनाही करता येत नाही. गटविकास अधिकारी वालावलकर यांनी ही भीती बोलताना व्यक्त केली.

झाडं, मांगर जमीनदोस्त – हे वादळ पुढे पुढे घोंगावत घोंगावत गोठोस, नारूरच्या दिशेने रांगणागडापर्यंत गेलेले दिसत होते. चक्रीवादळ झालं. अन्य घरांप्रमाणे गुरांचा नांगर होता त्याच्यावर झाड पडली आणि मांगर – जमीनदोस्त झाला. भात पिकाचे मोठे नुकसान झाले.

RELATED ARTICLES

Most Popular