27.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeSindhudurgसिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एन.एम.सी.ची मान्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला एन.एम.सी.ची मान्यता

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे खास.विनायक राऊत, नाम.उदय सामंत, आम.वैभव नाईक, आम. दीपक केसरकर यांनी सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे महाविद्यालयाला आता एन.एम.सी. ची मान्यता मिळाल्याने मार्ग मोकळा झाला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी चिपी विमानतळाचे उद्घाटन शुभ ठरल्याचे दिसून येत आहे. अनेक सुविधा हळूहळू उपलब्ध होऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षभरापूर्वी झालेल्या दौर्याच्या वेळी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन व्हावे अशी मागणी खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांनी केली होती.

अत्यंत गरजेच्या असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आज केंद्र शासनाच्या एन.एम.सी. म्हणजेच नॅशनल मेडिकल कमिशनची मान्यता मिळाली आहे. ओरोस येथे यंदाच्या वर्षापासून हे महाविद्यालय सुरु होणार असून या महाविद्यालयामध्ये एम.बी. बी.एस.च्या १०० जागांची उपलब्धता असणार आहे. अशी माहिती खास. विनायक राऊत आणि आम.वैभव नाईक यांनी दिली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या या मागणीला त्यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक प्रस्ताव देण्यात आले. या महाविद्यालयाला तात्काळ कॅबिनेटमध्ये मान्यता देण्यात आली. या महाविद्यालयाची स्थापना ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या २० एकर जागेमध्ये होणार आहे.

जिल्हा रुग्णालयाची हि जागा यापूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. ९६३ कोटिंची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे. जुलै महिन्यामध्ये एन.एम.सी च्या कमिटीने ओरोस येथे जाऊन आवश्यक बाबींची पाहणी केली होती. त्यामध्ये काही त्रुटी निघाल्या होत्या, परंतु, त्या त्रुटींची पूर्तता करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे खास.विनायक राऊत, नाम.उदय सामंत, आम.वैभव नाईक, आम. दीपक केसरकर यांनी सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे महाविद्यालयाला आता एन.एम.सी. ची मान्यता मिळाल्याने मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच महाविद्यालयाचे उर्वरित काम पूर्ण करण्यात येणार असून, यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आरोग्यविषयक चांगली सेवा उपलब्ध होणार असल्याची माहिती खा.  विनायक राऊत व आ.वैभव नाईक यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular