27.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeSindhudurgअलायन्स एअर ९ ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग दररोज थेट उड्डाणे

अलायन्स एअर ९ ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग दररोज थेट उड्डाणे

कोकण विभागातील ग्रीनफिल्ड विमानतळावरून उड्डाणे सुरू झाल्यानंतर अलायन्स एअर ही देशातील पहिली देशांतर्गत वाहक असेल जी सुरू करेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले-चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळावरून ९ ऑक्टोबर रोजी पहिले प्रवासी वाहतूक करणारे विमान उतरणार असून त्यासाठी आज पासून एअर इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर तिकीट बुकिंग करणे सुरू झाले आहे, अशी माहिती स्टेशन व्यवस्थापक समीर कुलकर्णी यांनी दिली. दरम्यान हे विमान यानंतर दररोज सुरू राहणार असून दुपारी ११:३५ वा. मुंबईहून सुटणार आहे. तर ते १:०० वाजेपर्यंत सिंधुदुर्गात पोहोचणार आहे. तसेच पुन्हा १:२५ वाजता हेच विमान पुन्हा मुंबईकडे रवाना होणार आहे. त्यामुळे आता मुंबई-सिंधुदुर्ग हा प्रवास तासाभरामध्ये होणे शक्य होणार असल्याचं ते म्हणाले.

एअरलाईन्स कंपनी अलायन्स एअर ९ ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा सुरू करणार असून,  अलायन्स एअर ही एअर इंडियाचीच प्रादेशिक उड्डाण उप कंपनी आहे. एअर इंडियाचे लवकरच खाजगीकरण होणार आहे. अलायन्स एअरने बुधवारी सांगितले की सिंधुदुर्ग विमानतळाचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, ९ ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्ग विमान उड्डाणे सुरू केली जाणार आहेत. अलायन्स एअर या मार्गावर दररोज थेटविमानसेवा सुरू ठेवणार आहे.

कोकण विभागातील ग्रीनफिल्ड विमानतळावरून उड्डाणे सुरू झाल्यानंतर अलायन्स एअर ही देशातील पहिली देशांतर्गत वाहक असेल जी सुरू करेल. ग्रीनफिल्ड विमानतळाला व्यावसायिक कामकाज सुरू करण्यासाठी विमान सुरक्षा नियामक डीजीसीएकडून गेल्या आठवड्यात एरोड्रोम परवाना मिळाला असून  अलायन्स एअरने एका निवेदनात स्पष्ट केले आहे कि,  अलायन्स एअर ९ ऑक्टोबरपासून मुंबई ते सिंधुदुर्गसाठी दररोज थेट उड्डाणे सुरू करणार आहे. या विमानाचे ऑनलाईन बुकिंग आज पासून एअर इंडियाच्या www.airIndia.in या वेबसाईटला सुरू झाले आहे यासाठी प्रवाशांनी SDW हा बुकिंग कोड नोंद करावा अशी माहिती त्यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular