ख्रिसमसची सुट्टी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यामुळे या सुट्ट्यांचा हंगाम लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. याचबरोबर विलासपूर (छत्तीसगड) ते मडगाव दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी धावणार आहे. कोकणात ख्रिसमस आणि नववर्षासाठी गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मंगळुरु, उडुपी यांसारखी ठिकाणे या काळात पर्यटकांनी फुलून जातात. ही वाढती गर्दी लक्षात घेऊन ख्रिसमस आणि नववर्ष २०२६ साठी कोकण रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून विलासपूर (छत्तीसगड) ते मडगाव दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर विशेष साप्ताहिक गाडी २० डिसेंबरपासून धावणार आहे. तसंच मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनल्स -मंगळुरु साप्ताहिक स्पेशल (८ फे-या) ही गाडीही या मार्गावरून धावणार आहे. गोव्याला नाताळ नववर्ष स्वागतसाठी जाणाऱ्या प्रवाशांकरिता ही गाडी उपयुक्त ठरणार आहे. या साप्ताहिक विशेष गाडीच्या एकूण ८ फेऱ्या होणार आहेत.
मध्य भारत ते कोकण-गोवा असा प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी सुविधा असणार आहे. या विशेष ट्रेनला प्रवासादरम्यान महाराष्ट्रातील आणि कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. ही गाडी (क्र. ०८२४१) २० डिसेंबर ते १० जानेवारी या काळात दर शनिवारी विलासपूर येथून दुपारी पावणेतीन वाजता सुटेल आणि सोमवारी पहाटे सव्वादोन वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासाकरता ही गाडी (क्र. ०८२४२) २२ डिसेंबर ते १२ जानेवारी या काळात दर सोमवारी पहाटे साडेपाच वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी, मंगळवारी सायंकाळी ४ वाजता विलासपूरला पोहोचेल. कोकणात ही गाडी कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडीला थांबेल.
कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या – दरवर्षीप्रमाणेच २०२६ मध्येही डिसेंबर अखेरपासून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यामध्ये मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली, बेंगळुरू आणि चेन्नई येथून कोकण व गोव्यात जाणा-या प्रवाशांचा समावेश मोठ्या प्रमाणात असतो. ही गर्दी सुरळीतपणे हाताळण्यासाठी विशेष ट्रेन, अतिरिक्त फे-या आणि जादा डबे जोडण्याचा विचार कोकण रेल्वे प्रशासनाकडून केला जात आहे.
७६ विशेष गाडया – नाताळ सुट्ट्यां व पर्यटनाचा हंगाम नववर्षाच्या स्वागताची तयारी यासाठी कोकणरेल्वे मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकणसह दक्षिण भारतात जाणा-या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वेने ७६ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरू जंक्शन अशा कोकण रेल्वे मार्ग धावणा-या साप्ताहिक विशेष गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांचे बुकिंग सुरू झाले आहे.
मुंबई एलटीटी – मंगळुरु साप्ताहिक स्पेशल (८ फेऱ्या) गाड्यांची माहिती पुढीलप्रमाणे – ट्रेन क्र – ०११८५/०११८६ (एलटीटी ते मंगळुरू जंक्शन) कालावधी १६ डिसेंबर २०२५ ते ६ जानेवारी २०२६ (४ फे-या) दिवस – दर मंगळवारी एलटीटीवरून सुटणार. वेळ – दुपारी ४ वाजता सुटेल आणि दुस-या दिवशी सकाळी १.०.५ वाजता मंगळुरू येथे पोहोचेल. ट्रेन क्र. ०११८६ (मंगळुरू जंक्शन ते एलटीटी) कालावधी १७ डिसेंबर २०२५ ते ७ जानेवारी २०२६ (४ फे-या) दिवस – दर बुधवारी मंगळुरूवरून सुटणार. वेळ – दुपारी १ वाजता सुटेल आणि दुस-या दिवशी सकाळी ६.५० वाजता एलटीटीला पोहोचेल.
या स्थानावर थांबा – ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, म रुडेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बायंदूर, कुंदापुरा, उडुपी आणि सुरथकल.

