29.2 C
Ratnagiri
Saturday, December 20, 2025

दापोलीतील पन्हळेकाजीत आढळला कोकणातील सर्वात प्राचीन शिलालेख

दापोली तालुक्यातील पन्हळेकाजी येथे कोकणातील सर्वात प्राचीन...

२४ तासात राज्यात थंडीची तीव्र लाट…

महाराष्ट्रातील तापमानात मागील दोन दिवसांपासून चढ-उतार पाहायला...

रत्नागिरीत प्रभाग १० मध्ये आज नगरसेवक निवडण्यासाठी मतदान

रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रभाग क्र. १० मध्ये...
HomeRatnagiriशृंगारपूरमधील दोन घरांमध्ये बिबट्या घुसला…

शृंगारपूरमधील दोन घरांमध्ये बिबट्या घुसला…

बिबट्याला पिंजरामध्ये बंद करण्यात यश मिळवले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

साऱ्या जिल्ह्यात बिबट्यांचा मुक्तसंचार सुरु झाला आहे. गुरुवारी रत्नागिरी सारख्या शहरातील गजबजलेल्या नरहर वसाहत परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असताना शुक्रवारी राजापूर आणि संगमेश्वरमध्ये बिबट्याचे दर्शन घडले. संगमेश्वरमधील शृंगारपूरमध्ये तर दिवसाढवळ्या दोन घरांमध्ये बिबट्या शिरला होता. संगमेश्वरातील शृंगारपूरमधील म्हस्केवाडीमध्ये बिबट्या घरात घुसल्याने घरातल्यांसह आजुबाजुच्या रहिवाशांची अक्षरशः भंबेरी उडाली. सायंकाळी ७ वा. च्या सुमारास दिवसाढवळ्या हा बिबट्या घरात घुसला. गावकरी आणि वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दोन तासांच्या अथक संघर्षानंतर त्याला पिंजरा बंद करण्यात यश मिळवले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

अधिक वृत्त असे की, शृंगारपूरमधील म्हस्केवाडीमध्ये आज बहुदा वाघाचा दिवस असावा. गावातील म्हस्केवाडीमधील सदाभाऊ म्हस्के यांच्या घरात कोंबडीच्या शिकारीसाठी शुक्रवारी दुपारी २ वाजण्याच्या सुम ारास बिबट्या घुसला होता. कोंबडीवर झडप घालून तिला अन्यत्र नेण्याचा प्रयत्न करताना म्हस्के यांच्या घरातील महिला सौ. ज्योती म्हस्के यांच्या तो निदर्शनास पडला. त्याला पाहताच सौ. ज्योती म्हस्के यांनी आरडाओरडा केला. तो ऐकून आजूबाजूची मंडळी धावत आली.

बिबट्या घाबरला – हा आरडाओरडा ऐकून बिबट्या घाबरला असावा. कारण त्यानंतर तो एकदम शांत झाला आणि कोंबडीच्या खुऱ्याड्याजवळच दबा धरुन लपून बसला. कोंबडी वावरत होती. एक कोंबडयावर झडप घालून नेत असताना त्यांच्या सौ, जयश्री म्हस्के यांनी ओरड केल्यानंतर तो काही वेळ दबा धरुन लपून बसला व नंतर काही वेळानंतर तो बाहेर पडला व पुन्हा बिनधास्त वावरू लागला. लोकं आजुबाजुला होती. त्यांची नजर चुकवत तो म्हस्के यांच्या घरातून हळूच निसटला.

दुसऱ्या घरात शिरला – म्हस्के यांच्या घरातून बाहेर पडल्यावर साऱ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला खरा. मात्र त्यानंतर बिबट्या महादेव सुर्वे यांच्या घरात शिरल्याची खबर आली आणि गावकरी हादरले. सर्वांचा मोर्चा सुर्वे यांच्या घरी गेला. सायंकाळी ६.३० ते ७.०० वाजण्याच्या सुमारास बिबट्या सुर्वे यांच्या घरात घुसला असावा. घरातील लोकांना तो दिसल्याने त्यांनी घराबाहेर धाव घेतली.

गावकरी जमले – महादेव सुर्वे यांच्या घरात बिबट्या घुसल्याचे वृत्त हा हा म्हणता गावात पसरले आणि गावकऱ्यांनी सुर्वे यांच्या घरी धाव घेतली. तोबा गर्दी झाली. सरपंच विनोद पवार, वामन म्हस्के, विमलाकांत पवार या मंडळींनी सुर्वे कुटुंबियांना धीर दिला. सरपंच विनोद पवार यांनी तत्काळ वनखात्याला खबर दिली.

पिंजरा लावला – वन खात्याचे पथक पिंजरा घेवून आले. गावकऱ्यांच्य मदतीने बिबट्याला पिंजराबंद करण्याचे प्रयत्न सुरु झाले. साधारणपणे दोन तासांनी या प्रयत्नांना यश आले आणि शुक्रवारी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला, अशी माहिती सरपंच विनोद पवार यांनी दिली. वनविभाग या बिबट्याला घेवून गेला असून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular