24.5 C
Ratnagiri
Monday, February 3, 2025

राजापूर पालिकेच्या गोठ्याची दुरवस्था

तीव्र उतार आणि नागमोड्या वळणांच्या राजापूर शहरातील...

गावाचा सर्वांगीण विकास करणार – आ. शेखर निकम

गावाच्या विकासासाठी निधी, योजना आणि आवश्यक सुविधा...
HomeIndiaनावात काय आहे? एक सुखद धक्का

नावात काय आहे? एक सुखद धक्का

सोशल मिडीयावर अचानक लोखंडेंच्या खुर्चीचा फोटो पासून चर्चेचा विषय बनला आहे.

शेक्सपिअर म्हणतात कि, नावात काय आहे? पण नावाचा संबंध किती महत्वाचा असल्याचा सुंदर अनुभव सांगलीमधील एक व्यवसायिकाला आला आहे. कधी कोणत्या गोष्टीला कशी प्रसिद्धी मिळेल हे सांगता येत नाही. सांगली जिल्ह्यातील सावळज गावामधील बाळू लोखंडे हे मागील अनेक वर्षांपासून मंडप डेकोरेटर्स व्यवसायाचे काम करत आहेत. या व्यवसायातील तेरा वर्षांपूर्वी त्यांनी जुन्या लोखंडी खुर्च्या भंगारामध्ये विकायला काढल्या होत्या.

या जुन्या खुर्च्या विकून लोखंडेनी नवीन प्लास्टिकच्या खुर्च्या खरेदी केल्या. इंग्लंडमधील एका कॅफे व्यवसायिकाने एकूण १५ खुर्च्या खरेदी केल्या होत्या. तेव्हापासून त्या खुर्च्या इंग्लंडच्या मँचेस्टरमध्ये एका कॅफेमध्ये दररोजच्या वापरासाठी वापरल्या जात आहेत. सोशल मिडीयावर अचानक लोखंडेंच्या खुर्चीचा फोटो पासून चर्चेचा विषय बनला आहे.

लोखडेंची खुर्ची नेमकी इंग्लंडमध्ये कशी पोहोचली याबाबत एक मजेदार किस्सा समोर आला आहे. बाळू लोखंडे नाव लिहलेले असलेल्या एका लोखंडी खुर्चीचा व्हिडीओ क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. इंग्लंडसारख्या बलाढ्य देशामध्ये सांगली मधील बाळू लोखंडे यांच्या खुर्च्या वापरल्या जात असल्यामुळे आनंद आणि आश्चर्य दोन्ही व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, सुनंदन लेले यांनी अपलोड केलेल्या व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर सांगली आणि बाळू लोखंडे यांच्या खुर्च्यांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. हि बातमी जेंव्हा लोखंडे यांच्यापर्यंत पोहोचली तेंव्हा त्यांनी   “मी भंगारात काढलेल्या खुर्च्या इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये जाऊन पोहोचतील अशी कधी कल्पानाही केली नव्हती, आज तेरा वर्षांनंतर देखील माझ्या नावाच्या खुर्चीने मला प्रसिद्धी मिळवून दिल्यामुळे मी अतिशय आनंदी झालो असून, त्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अशी प्रतिक्रिया दिली.

RELATED ARTICLES

Most Popular