मराठी सिनेविश्वातील क्यूट कपल मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकरची जोडी सोशल मीडियावर प्रचंड पसंत केली जाते. कोविड काळामध्ये काही महिन्यांपूर्वी या दोघांनी लग्न केलं आहे. मिताली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. ती सतत आपले विविध रूपातील ग्लॅमरस फोटो आणि रिल्स शेअर करून चाहत्यांचे मनोरंजन करत असते.
आपल्या लाडक्या कलाकारांच्या लहान सहन गोष्टी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. त्यांचा कसाही असला तरी, प्रत्येक अंदाज चाहत्यांना पसंत पडत असतो. पण काहीवेळा हे कलाकार नकळत ट्रोलसुद्धा केले जातात. असच काहीसं मिताली सोबत सुद्धा झाले आहे.
मराठी अभिनेत्री मिताली मयेकरने नुकताच कोरोना लशीचा पहिला डोस घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र हा व्हिडीओ शेअर करताच हि अभिनेत्री मोठया प्रमाणात ट्रोल झाली आहे. जाणून घेऊया, नेमकं काय आहे या मितालीच्या व्हिडीओमध्ये.
मराठमोळी अभिनेत्री मिताली मयेकरची एक बिनधास्त, मनमोकळी अभिनेत्री म्हणून ओळख आहे. मात्र कोरोनाच्या लसीकरणाच्या या व्हिडीओवरून चाहते तिची चांगलीच खिल्ली उडवताना दिसत आहेत. अभिनेत्री मिताली मयेकरने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कोरोनाचा लसीचा पहिला डोस घेताना तिची झालेली अवस्था याबद्दलचा व्हिडियो शेअर केला आहे. मात्र लस घेताना तीच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून ती जरा जास्तचं नर्व्हस झालेली दिसत आहे. या व्हिडीओमध्ये इंजेक्शनला पाहून मिताली जास्तच चिंतेत असल्याचं दिसत आहे.
डाव्या हातावर असलेल्या तिच्या बॉडी टॅटू मुळे ती जास्त ट्रोल झाली आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स मितालीला ट्रोलर्स म्हटत आहेत कि, शरीरावर इतके टॅटू काढून घेतलेस, तेव्हा भीती नाही का वाटली आणि आता इतक्या साध्या इंजेक्शनला घाबरताना दिसत आहेस!
दुसर्या एका युजर्सने कमेंट करत म्हटलं आहे, टू मच ओव्हरऍक्टिंग , तर तिसऱ्या युजरने म्हटलं आहे, तू इतके टॅटू बनवले आहेस, लस तर अतिशय लहान गोष्ट आहे आणि जगण्यासाठी आवश्यक आहे. तर काही युजर्सनी क्यूट एक्स्प्रेशन आहेत असे सुद्धा म्हटले आहे.