26.4 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeMaharashtraएलपीजी गॅसवरील सबसिडी तुम्हाला मिळते का?

एलपीजी गॅसवरील सबसिडी तुम्हाला मिळते का?

सबसिडी न मिळण्यामागे सुद्धा शासनाने दोन कारणे दिली आहेत.

मागील वर्षापासून इंधन आणि घरगुती गॅसच्या अव्वाच्या सव्वा वाढलेल्या किमती बघून सर्वसामान्य जनतेचे आर्थिक गणित कोलमडतच चालले आहे. एलपीजी सिलेंडरची किंमत आत्ता हजाराच्या घरामध्ये पोहोचत आली आहे. दिवसेंदिवस महाग होत असलेल्या घरगुती सिलेंडरच्या स्थितीमुळे, निदान काही प्रमाणात मिळणार्या सबसिडीमुळे सामान्य लोकांना सिलिंडरच्या महागाईतून थोडातरी दिलासा मिळतो.

नक्की काय आहे, सबसिडीची संपूर्ण प्रक्रिया ते जाणून घेऊया थोडक्यात. जर तुम्हाला सबसिडी मिळत नसेल तर याचे कारण असु शकते की,  तुम्ही याच्या नियमात बसत नाही. जर तुम्हाला एलपीजी सिलिंडरची सबसिडी तुमच्या खात्यात जमा होते आहे की नाही हे माहित नसेल,  तर ते जाणून घेण्यासाठी कोणता पर्याय आहे?

त्यासाठी  सर्वप्रथम कंपनीच्या www.mylpg.in वेबसाइटला भेट द्यायची. यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला तीन कंपन्यांच्या गॅस सिलिंडरचा फोटो समोर दिसतील.  तुमचा सेवा पुरवठादार कोणतीही असो, गॅस सिलेंडरच्या फोटोवर क्लिक करायचे.  यानंतर पुढील विंडो उघडेल त्यामध्ये तुमच्या गॅस सेवा प्रदात्याची माहिती नमूद केलेली असेल.

त्यानंतर समोर असणाऱ्या पेजवर उजव्या बाजूला साइन-इन आणि नवीन वापरकर्ता असे दोन पर्याय दिलेले असतील, त्यातील योग्य तो निवडायचा. जर आधीपासूनच तुमचा आयडी तयार असेल,  तर तुम्हाला साइन इन पर्याय वापरावा लागेल. आणि आयडी तयार नसेल तर तुम्हाला नवीन यूजर पर्याय निवडून, आयडी तयार करावा लागेल.

नंतर उघडणाऱ्या विंडोमध्ये उजव्या बाजूला व्ह्यू सिलेंडर बुकिंग हिस्ट्रीचा पर्याय असेल,  त्यावर क्लिक करायचे. त्या पर्यायामध्ये तुम्हाला सबसिडी मिळत आहे की नाही हे येथे कळेल. जर सबसिडी मिळत नसल्यास तुम्ही 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवू शकता.

सबसिडी न मिळण्यामागे सुद्धा शासनाने दोन कारणे दिली आहेत. एक म्हणजे तुमच्या उत्पन्नाची मर्यादा, जर तुमचे वार्षिक उत्पन्न १० लाख रुपये किंवा त्याहून अधिक असेल, तर  मग सरकार त्यांना सबसिडी देत नाही. आणि दुसरे म्हणजे तुमचे आधारकार्ड जर कनेक्शन बरोबर लिंक केलेले नसेल तर  सबसिडी बंद होऊ शकते. त्यामुळे जर सबसिडी जाणून घ्यायची असेल तर वरीलप्रमाणे प्रक्रिया करावी.

RELATED ARTICLES

Most Popular