24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeMaharashtra१५ वर्षे जुन्या वाहनांच्या नोंदणी नूतनीकरणासाठी आठपट अधिक शुल्क

१५ वर्षे जुन्या वाहनांच्या नोंदणी नूतनीकरणासाठी आठपट अधिक शुल्क

१५ वर्षांनंतर वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण दर ५ वर्षांनी करणे बंधनकारक केले आहे.

रस्ते, वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने वाहतूक आणि वाहन नोंदणीसंबंधी नवीन अधिसूचना जरी केली असून,  पुढील वर्षीच्या एप्रिल महिन्यापासून १५ वर्षे जुन्या वाहनांच्या नोंदणी नूतनीकरणासाठी मालकाला  आठपट अधिक शुल्क मोजावे लागणार आहेत. त्याच प्रमाणे व्यावसायिक वाहनांच्या फिटनेस सर्टिफिकेट साठीदेखील आठपट अधिक शुल्क भरावे लागणार आहे.

वाहनांच्या नोंदणीविषयीचे नवे नियम पुढील वर्षापासून लागू होत असून, १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या कारच्या नोंदणी नूतनीकरणासाठी सध्या फक्त ६०० रुपये शुल्क लागते. अधिसूचनेनुसार, ते पुढील वर्षी ५ हजार रुपये होईल. जुन्या बाइक्सचे नोंदणी शुल्क ३०० रुपयांवरून १ हजार रुपये इतके होईल.

दिल्ली व आजूबाजूच्या परिसरामध्ये या नव्या नियमांचा कोणताही परिणाम दिसून येत नाही आहे. कारण, त्या प्रभागामध्ये १० वर्षांपेक्षा जास्त जुन्या वाहनांवर आधीच बंदी घातलेली आहे. त्यामुळे आता पुढील वर्षापासून, बस अथवा ट्रकचे फिटनेस सर्टिफिकेट काढण्यासाठी लागणारे शुल्क १,५०० रुपयांवरून १२,५०० रुपये एवढे आकारण्यात येईल.

१५ वर्षे वापरून झालेली वाहने शक्यतो नंतर स्क्रप मध्ये काढतात. परंतू, काही जण त्याची मुदत वाढवून घेऊन तेवढी जुनी वाहने वापरत असतात. सूत्रांनी सांगितल्या प्रमाणे,  लोकांनी जुनी वाहने बाळगू नयेत, यासाठी हि शुल्क वाढ करण्यात आली आहे. याशिवाय १५ वर्षांनंतर वाहनांच्या नोंदणीचे नूतनीकरण दर ५ वर्षांनी करणे बंधनकारक केले आहे. ८ वर्षांनंतर व्यावसायिक वाहनांना दरवर्षी फिटनेस सर्टिफिकेट घेणे बंधनकारक आहे. तसेच फिटनेस तपासणीसाठी स्वयंचलित यंत्राचा वापर करण्यास प्राधान्य दिले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular