रत्नागिरीची ओव्हरऑल झालेली दूरावस्था बघता, रत्नागिरीचे पुन्हा आधीसारखीच सुशोभित व्हावी यासाठी नाम. उदय सामंत विशेष प्रयत्न करताना दिसत आहेत. अनेक विरोधकांच्या टीकेला आपल्या कामातून उत्तर देण्याचे त्यांनी ठरविले आहे. १० ऑक्टोबरपासून रत्नागिरीतील रस्ते गुळगुळीत करण्याच्या कामाला प्रारंभ झाला असून, १५ ऑक्टोबरपासून इतर विकासकामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये, रत्नागिरी शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ १५ ऑक्टोबर रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर केला जाणार असल्याची माहिती दिली.
कालपासून रत्नागिरी शहरातील रस्ते डांबरीकरण कामाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण शहरातील रस्ते गुळगुळीत केले जाणार असून, १५ रोजी विविध भागातील रस्ते कामासह अन्य विकास कामाचा शुभारंभ केला जाणार असल्याचे नाम. सामंत यांनी सांगितले आहे.
रत्नागिरी शहर परिसर वगळता इतर अंतर्गत रस्त्यांची सुद्धा वाताहत लागलेली आहे. कोकणनगर, मारुती मंदिर, तेलीआळी आदी भागातील विकास कामाना सुद्धा १५ तारीखपासून सुरूवत केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे नगर परिषद इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमदेखील यादिवशी केला जाणार आहे. शहराच्या वैभवात भर पडेल असे ही सुमारे १४ कोटी २८ लाख खर्चून ही प्रशासकीय भव्य अद्ययावत इमारत उभारली जाणार आहे.
कालच्या महाराष्ट्र बंद बाबत सुद्धा त्यांनी वक्तव्य केले आहे कि, महाविकास आघाडी सरकारच्या आवाहनाला मनाजोगा प्रतिसाद देऊन व्यापाऱ्यांनी आज बंद काटेकोरपणे पाळला. त्याबद्दल शिवसेनेचा उपनेता तसेच लोकप्रतिनिधी या नात्याने नाम. सामंत यांनी व्यापाऱ्यांना धन्यवाद दिले.