गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या छोटे-मोठे व्यवसायिकाना पाच दिवसांची नोटीस गेल्यानंतर सुद्धा काहीच परिणाम झाल्या नसल्याने आज अखेर मेरीटाईम बोर्डाकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. समुद्रकिनारी असलेल्या या अनधिकृत दुकानांवर आज पोलीस बंदोबस्तात महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे कॅप्टन संजय उगलमुगले, डीवायएसपी सचिन बारी यांच्या उपस्थितीत गुहागर पोलीस व रॅपिड फोर्स बोलावून जेसीपी फिरवून जमीनदोस्त करण्यात आली.
यामुळे येणाऱ्या पर्यटकाना सेवा देणारी दुकाने आता भुईसपाट झाली आहेत. दीड वर्षानंतर सुरु झालेला पर्यटन व्यवसाय म्हणून गुहागर समुद्रकिनारी तात्पुरत्या स्वरूपात गाळे उभारुन दुकानदार पोटापाण्याचा व्यवसाय करीत होते. परंतु, शासकीय सूचनेचा आदर न करता सर्हास सुरूच आहेत. त्यामुळे ते पाडण्यात आल्याने व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
येथील समुद्रकिनाऱ्यावरील बंदर विभागाच्या मालकीच्या जागेतील अतिक्रमण करणाऱ्या २२ खोकेधारकांची बांधकामे तोडण्यास बंदर विभागाने मंगळवारी सुरुवात केली. सकाळी राजकीय पक्षांतर्फे तसेच गुहागरातील नागरिकांतर्फे कारवाई होऊ नये म्हणून अतोनात प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी भूमिकेवर ठाम राहत दुपारी साडेबारा वाजता अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. या जमिनीतील सर्व अनधिकृत बांधकामे विनाविलंब हटविण्यात यावीत; अन्यथा १२ ऑक्टोबरला अतिक्रमण हटवू, अशी अंतिम नोटीस सहायक बंदर निरीक्षक, पालशेत यांनी खोकेधारकांना दिली होती.
पहिली नोटीस आल्यानंतर ही कारवाई थांबवावी म्हणून काही खोकेधारकांनी न्यायालयाकडे दाद मागितली आहे. मात्र, शासकीय जागेवर अनधिकृत बांधकाम असल्याने न्यायालयाकडून ‘जैसे थे’ परिस्थिती राहील, असा कोणताही आदेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे बंदर विभागाने नोटीशीत जाहीर केल्याप्रमाणे मंगळवारी अतिक्रमण हटविण्याची भूमिका हाती घेतली. मंगळवारी सकाळी बंदर विभाग अतिक्रमण हटविणार असल्याने राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी धावपळ सुरु केली.
आपापल्या नेत्यांना संपर्क करण्यात आला. मंगळवारची कारवाई थांबवावी, अशी विनंती करण्यात आली. पण प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी कोणाच्याही दबावात न येता कारवाई करणारच अशी भूमिका घेतली. खोकेधारकांना दुपारी १२ वाजेपर्यंत खोक्यातील चिजवस्तू रिकाम्या करण्यास मुदत दिली. त्या नंतर अतिक्रमण पाडण्यास सुरवात केली. या वेळी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी विनायक उगलमुगले, बंदर अधिक्षक बोरगे, पोलिस उपविभागीय अधिकारी सचिन बारी, महावितरण, महसूल, नगर पंचायतचे अधिकारी उपस्थित होते.