23.5 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeSindhudurgप्रवासी उशीरा येण्याने, सुरक्षा यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण

प्रवासी उशीरा येण्याने, सुरक्षा यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण

सिंधुदुर्ग विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांनी विमान सुटण्याच्या नियोजित वेळेच्या दोन तास अगोदर विमानतळावर उपस्थित असणे गरजेचे आहे.

सिंधुदुर्ग चिपी विमानतळ सुरू झाल्यापासून येथील विमानसेवेला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. परंतु काही लोकांची मानसिकता आओ जाओ तुम्हारा घर अशा प्रकारची असल्याची सुद्धा दिसून येते. सिंधुदुर्ग विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांनी विमान सुटण्याच्या नियोजित वेळेच्या दोन तास अगोदर विमानतळावर उपस्थित असणे गरजेचे आहे. विमान प्राधिकरणाचे आखून दिलेले नियम पाळणे तितकेच गरजेचे आहे, अशी माहिती अलायन्स एअरचे सिंधुदुर्ग मॅनेजर समीर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कुडाळ एमआयडीसीच्या शासकीय विश्रामगृहावर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचे ९ ऑक्टोबरला उद्‍घाटन झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच ते सबंध महिनाभरापार्यंत या विमानाचे तिकीट बुकिंग फुल झाले. प्रवाशांचा विमान सेवेला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. मात्र मुंबईला जाणारे काही प्रवाशी कधीकधी उशिराने येत असल्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण पडत आहे. यासाठी विमान प्राधिकरणाच्या नियमानुसार तपासणीसाठी प्रवाशांना विमानतळावर विमान सुटण्याच्या अगोदर दोन तास उपस्थित राहणे अनिर्वाय असणे हे नियमावलीत नमूद केलेले आहे. त्यामुळे या विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या सर्व प्रवासी या नियमांचे पालन करण्यास कटिबद्ध आहेत.

त्याचप्रमाणे लगेज संदर्भात सुद्धा विशेष नियमावली ठरविण्यात आली आहे. एक प्रवाशी त्यांच्या हातातील बॅगेतून ५ किलो तर इतर साहित्य म्हणून १५ किलो वजनाचे साहित्य स्वत: सोबत नेऊ शकतो. १५ किलोपेक्षा अधिक साहित्य न्यायचे असल्यास प्रत्येक किलोला ६५० रुपये अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. ३२ किलोपेक्षा अधिक वजनाचे एकत्र साहित्य विमानातून नेण्यास परवानगी नसते. जर ३२ किलोपेक्षा अधिक वजनाचे साहित्य न्यायचे असल्यास त्याची विशेष विभागणी करून नेणे आवश्यक आहे, असे अलायन्स एअरचे सिंधुदुर्ग मॅनेजर समीर कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES

Most Popular