26.8 C
Ratnagiri
Friday, August 8, 2025

रत्नागिरीजवळ भाट्ये येथे अपघात…

रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या रस्त्यावर भाट्ये गावाकडे...

राजापूर तालुक्यामध्ये आढळली अतिदुर्मीळ ‘हंसतुरा’ प्रजाती

राजापूर तालुक्यात पावसाळ्यात उगवणारी, एक अतिदुर्मीळ आणि...

कोल्हापूरकरांसमोर ‘वनतारा’ झुकलं ! ‘महादेवी’ पुन्हा नांदणी मठात येणार

हत्तीणीला पुन्हा पाठवण्यात येणार आहे. वनताराचे सीईओ...
HomeLifestyleहिंवाळ्यातील केसांचा कोरडेपणा दूर करण्याच्या पद्धती

हिंवाळ्यातील केसांचा कोरडेपणा दूर करण्याच्या पद्धती

ऋतूनुसार विशेष काळजी घेणे आवश्यक असते म्हणतात ते खोटे नव्हे. प्रत्येक ऋतूमध्ये वातावरणांत होणाऱ्या अमुलार्ग बदलामुळे शरीर, त्वचा, केस, नखे यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणत परिणाम घडून येतात. सध्या सुरु असलेल्या हिंवाळयामध्ये कोणती काळजी घ्यावी ते पाहूया.

हिवाळयाच्या हंगामात वातारणात गारवा जास्त असल्याने केस आणि त्वचा जास्त प्रमाणात रुक्ष होतात. कोरड्या हंगामाची सुरुवात केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर केसांसाठीही त्रासदायक ठरत असते. बदलत्या ऋतूंच्या अनुषंगाने स्किनकेअर रूटीनसोबतच, केसांची निगा राखण्यासाठी आपल्याला विशेष काळजी घेणे गरजेचे असते.

वातावरणात उष्णता आणि आर्द्रतेचे प्रमाण कमी होत असल्याने आपल्याला आपल्या केसांची अतिरिक्त काळजी घ्यावी लागते. त्यासाठी काही टिप्स पाहूया. ज्याचा तुम्ही वापर करून निरोगी केस राहण्यासाठी  काळजी घेऊ शकता.

हवामान जितके कोरडे होईल तितके केस कोरडे होतात. केसांचा कोरडेपणा टाळण्यासाठी तुम्हाला एक मॉइश्चरायझिंग शैम्पूची आवश्यकता आहे. जो हायड्रेटिंग आणि ऑर्गेनिक दोन्ही प्रकारामध्ये मोडत असेल. उन्हाळ्यात वापरण्यासाठी हलके कंडिशनर योग्य आहे. परंतु हिवाळ्यात वापरण्यासाठी केसांचा योग्य पोत टिकण्यासाठी त्यांना डीप कंडिशनिंग करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जोजोबा, नारळ यांसारखे तेल असलेले कंडिशनर निवडा जे तुम्हाला चांगले हायड्रेशन देते.

खोबरेल तेल मोठ्या प्रमाणात असलेला कोरडेपणाचा सामना करून ते कमी करू शकते. आपले केस मजबूत बनवू शकते. तसेच यामुळे केसांना फुटलेले फाटे सुद्धा नष्ट होऊन केस तंदुरुस्त बनू शकतात. केसांसाठी नियमित तेलाच वापर केल्याने टाळू कोरडी होण्यापासून बचाव होतो. तसेच केसमध्ये कोंडा निर्मिती होणे थांबते.

हिवाळा ऋतूमध्ये सुद्धा तुम्हाला स्टाइलिंश केस दिसावे असे वाटत असतील तर केसांना सीरम वापरा. चांगल्या दर्जाच्या कंडिशनिंगसाठी हेअर मास्क हा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे आणि नक्कीच तो वापरणे फायदेशीर सुद्धा आहे. अंडी, मध किंवा दही यांसारख्या नैसर्गिक घटकांचा सुद्धा केसांना मॉइश्चरायझिंग करण्यासाठी हेअरमास्क बनविता येतो.

RELATED ARTICLES

Most Popular