26.1 C
Ratnagiri
Thursday, August 7, 2025

गणेशोत्सव कालावधीत रेल्वेप्रवासात मिळणार आता उकडीचे मोदक

गणरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना वंदे भारत आणि...

पुनर्वसन वसाहत की, कचऱ्याचे डम्पिंग ग्राऊंड

मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत पुनर्वसन वसाहत...

महाविकास आघाडीचा महावितरण अधिकाऱ्यांना सज्जड इशारा

दिवसात अनेकवेळा लाईट जात आहे.... तरीपण अवाच्यासवा...
HomeRatnagiriनिवृत्ती वेतनधारकांसाठी गुड न्यूज

निवृत्ती वेतनधारकांसाठी गुड न्यूज

निवृत्ती वेतन धारकांसाठी सरकार विविध उपयोगी अशा योजना राबवत असून, अनेक सुविधा त्यांना उपलब्ध करून देत असते. पेंशनरची एका ठराविक बँकेमध्ये पेंशन जमा केली जाते. तिथे प्रत्येक वर्षाला हयात दाखला संबंधित व्यक्तीला सादर करावा लागतो. त्यानंतरच नवीन आर्थिक वर्षाची पेंशन सुरु करण्यात येते.

आत्ता सरकारने इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत आता एनइएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, वीज भरणा, टेलिफोन बील, मोबाईल रीचार्ज, विमा हप्ता भरणे अशा अनेक सुविधांबरोबरच आता जिल्ह्यातील निवृत्ती वेतनधारकांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून त्यांचे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट म्हणजेच  हयात प्रमाणपत्र देखील काढता येणार आहे. ही सुविधा ७० रुपयांमध्ये देण्यात येत असून जिल्हयातील सर्वच पोस्ट कार्यालयांमध्ये सुरु आहे. तरी जिल्हयातील सर्वच निवृत्ती वेतनधारकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन अधीक्षक डाकघर रत्नागिरी विभाग यांनी केले आहे.

या योजनेंचा लाभ घेण्यासाठी सर्व निवृत्ती वेतन धारकांनी आपला मोबाइल नंबर, आधार नंबर, पीपीओ नंबर ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर आधार क्रमांक हा पेन्शन खात्याशी संलग्न असणे देखील गरजेचे आहे. या सेवेचा घरपोच लाभ देखील निवृत्ती वेतन धारक घेऊ शकतात. यासाठी मोबाइलमध्ये गूगल प्ले स्टोअरमधून “postinfo” हे अॅप्लिकेशन डाउनलोड करून त्याद्वारे विनंती करू शकतात. “postinfo” हे अॅप्लिकेशनद्वारे विनंती नोंदविलेनंतर त्या भागातील पोस्टमन निवृत्ती वेतनधारकांच्या घरी जाऊन डिजिटल लाइफ सर्टिफिकेट म्हणजेच हयात प्रमाणपत्र सहजगत्या काढून देऊ शकतात. तसेच जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये फोन करून देखील मागणी करू शकता. जे आजारी रुग्ण पेन्शनर्स आहेत त्यांच्यासाठी हि अतिशय उपयुक्त बाब ठरणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular