27.2 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeRatnagiriराजेवाडी ते आंबडवे रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात आम. योगेश कदम आक्रमक

राजेवाडी ते आंबडवे रस्त्याच्या रखडलेल्या कामाविरोधात आम. योगेश कदम आक्रमक

दापोली विधानसभा मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली रखडलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, मालवाहतुक संघटना अध्यक्ष आदेश केणे व पदाधिकारी, तालुका संघटक अनंत लाखण व सर्व पदाधिकारी शिवसेना मंडणगड तालुक्याच्या वतीने तसेच यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळ गावी जाणारा राजेवाडी ते आंबडवे रस्त्याचे काम गेले दोन वर्ष रखडल्याने राष्ट्रीय महमार्ग प्राधिकरण व केंद्र शासनाच्या विरोधात तसेच भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून जोरदार घोषणा बाजी करत आमदार योगेश कदम यांनी म्हाप्रळ येथे जनआक्रोश आंदोलनाला सुरुवात केली.

भूमिपुत्र व जनतेच्या न्याय हक्कासाठी आमदार योगेश कदम हे आक्रमक झाले असून, आम. योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता, कार्यकारी अभियंता श्री.बांगर यांनी काम लवकरात लवकर सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

२२ नोव्हेंबर पासून खड्डे भरण्याचे लेखी आश्वासन हाती मिळाल्यानंतर आम. योगेश कदम यांनी आंदोलन स्थगित केले. तसेच जर दिलेल्या तारखेपर्यंत खड्डे भरले गेले नाहीत, तर पेण येथील तुमच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरु करू असे आमदार यांनी ठणकावले.

यावेळी शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर,  तालुका संघटक अनंत लाखण, ज्येष्ठ शिवसैनिक सुलतानभाई मुकादम, उपतालुका प्रमुख हरिश्चन्द्र कोदेरे, रामदास रेवाळे माजी सभापती आदेश केणे, विभागप्रमुख दीपक मालुसरे, राजेश भवने,  महिला विभाग संघटक सौ.सुप्रियाताई ढोंडगे, उपजिल्हाधिकारी चेतन सातोपे, उपसरपंच म्हाप्रळ अजहर मुकादम, अहमद मुकादम, म्हाप्रळ, चिंचाळी, पन्हळी, लोकरवण, कुंभारली, येथील भूमिपुत्र ग्रामस्थ तसेच जयराम राठोड आजिम कडवेकर, सर्व शिवसेना, युवासेना मालवाहतुक संघटना पदाधिकारी तहसीलदार व पोलिस निरीक्षक आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular