24.4 C
Ratnagiri
Friday, September 20, 2024

Redmi Note 14 मालिका 50MP OIS कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाईल…

कंपनीने अधिकृतपणे Redmi Note 14 सीरीजचा खुलासा...

आता कसोटी क्रिकेटचे नगारे, डिसेंबरपर्यंत दहा सामने

सातत्यपूर्ण व्हाइटबॉल क्रिकेट खेळल्यानंतर उद्यापासून भारताच्या कसोटी...

नेटवर्कअभावी लाडक्या बहिणी त्रस्त, ग्रामीण भागातील स्थिती

पुरवठा विभागाने घरगुती गॅस सिलिंडरसाठी मोबाईलवरील येणारा...
HomeMaharashtraशाळा १ डिसेंबर पासूनच सुरु होणार

शाळा १ डिसेंबर पासूनच सुरु होणार

कोरोना नवीन विषाणूचा धोका लक्षात घेता, देशात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाऊले उचलली जात आहेत. अशामध्ये शिक्षण विभागाकडून पहिली ते सातवी वर्गाच्या शाळा राज्यभरात १ डिसेंबरपासून सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. त्याबाबत काय निर्णय होणार?  याकडे लक्ष लागून होते. मात्र १ डिसेंबर पासून राज्यातील पहिली ते सातवी वर्गाच्या शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग ठाम असून याबाबत आज शासन निर्णय शिक्षण विभागाने जारीही केले आहेत.

शासन निर्णयाची वाट शिक्षण अधिकारी, आयुक्त, शिक्षक, पालक व महापालिका, नगरपालिका सर्वच जण पाहत होते. कोव्हीड टास्क फोर्स कडून सांगण्यात आले आहे कि, सुरक्षिततेच्या उपाययोजना जरी केल्या जात असतील तरी सध्या शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही आहे. त्यामुळे त्या अनुसरून  मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाने शासन निर्णयासह आदेश जारी केले आहेत. त्याचे शाळांमध्ये काटेकोरपणे पालन केले तर या विषाणूचा धोका फारसा होणार नाही असे डॉक्टरांनी मत व्यक्त केल आहे.  शिवाय, या विषाणूचा प्रादुर्भाव आणि त्याचे परिणाम यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून विशेष अभ्यास सुरू आहे.

मात्र,  सध्यातरी शिक्षण विभागाकडून १ डिसेंबर पासून शाळा सुरू करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आले आहेत. त्यासाठी काही निर्देश देण्यात आले आहेत ते पाहूया.

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे दोन डोस घेऊन लसीकरण पूर्ण झालेले असावे. पालकांच्या संमती शाळेत येण्यासाठी आवश्यक असणार आहे, पालकांचे संमतीनेच विद्यार्थी शाळेत येऊ शकेल. शाळांमध्ये बायोमेट्रिक उपस्थिती पद्धतीचा वापर केला जाऊ नये. शाळेत कमी गर्दी राहील याकडे लक्ष द्यावे.  एकत्रित उपक्रम, खेळ किंवा सामूहिक प्रार्थना सध्या टाळाव्यात.

दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फूटाचे अंतर बाळगावे. शाळेत सर्वांसाठी मास्क घालणे बंधनकारक आहे. वारंवार हात धुवावे व शाळेत स्वच्छता ठेवावी. ज्यांना कोणतीही लक्षणे नाहीत अशाच व्यक्तींना शाळेच्या आवारात किंवा वर्गात येण्यास अनुमती असावी. शाळांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे.

जर विद्यार्थी संख्या जास्त असली तरी, एका बेंचवर एकच विद्यार्थी बसेल अशाप्रकारे नियोजन करावे. त्याचप्रमाणे विद्यार्थी संख्या जास्त असलेल्या शाळांमध्ये व्यवस्थापन नीट व्हावे यासाठी दोन सत्रांमध्ये शाळा भरवण्यात यावी. शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांना टप्प्याटप्प्याने शाळेत बोलवावे आणि सोडताना सुद्धा तशीच पद्धत अवलंबवावी.

RELATED ARTICLES

Most Popular