31.6 C
Ratnagiri
Monday, December 8, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeKokanकोकणकन्या हिमानी परब हिला मल्लखांबमध्ये अर्जुन पुरस्कार

कोकणकन्या हिमानी परब हिला मल्लखांबमध्ये अर्जुन पुरस्कार

तळकोकण म्हणून ज्याची ख्याती असलेले सिंधुदुर्ग येथील हिमानी परब हीने पारंपारिक खेळाची कला जपत आज मानाच्या अर्जुन पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. हिमानी मागील काही वर्षामध्ये पारंपारिक मल्लखांब या क्रीडा प्रकारामध्ये दिमाखदार कामगिरी करत आहे. त्यामुळे तिचा वर्ष २०२१ चा अर्जून पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.

सिंधुदुर्गसह, संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा मोठा अभिमानाचा क्षण आहे. २०२१ चा अर्जून पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून हिमानी परबवर कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. देशामध्ये मल्लखांब क्रीडा प्रकारामध्ये हिमानी परब हि अर्जुन पुरस्कार मिळवणारी प्रथम महिला खेळाडू ठरली आहे.

देशातील कोणत्याही महिलेला याआधी या खेळामध्ये ही किमया साधता आलेली नाही. मात्र हिमानीने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवलं आहे. वयाच्या २० व्या वर्षी हिमानीला या उत्कृष्ट  कामगिरीबद्दल गौरवण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मान नक्कीच उंचावली आहे. हिमानी याआधी २०१९ मध्ये जागतिक विजेती झाली. त्यानंतर तिच्या या भरघोस यशाची भारत सरकारकडून दखल घेतली गेली आणि तिचा गौरव करण्यात आला आहे.

मल्लखांब हा लाकडी पोलवरील खेळ आहे. अनेक देश विदेशामध्ये या खेळाचा वेगानं प्रसार होत आहे. त्यामुळे अनेक युवक-युवती आपसूकच या खेळाकडे आकर्षित होत आहेत. मेहनत केल्यानंतर कोणतही यश दूर नाही, हे हिमानीने सहज सिद्ध करून दाखवले आहे. लहानपणापासून मल्लखांब या क्रीडा प्रकारामध्ये पारंगत असलेल्या हिमानीने याआधीही वयाच्या अवघ्या  नवव्या वर्षी जर्मनीतील काही युवकांना मल्लखांबचं प्रशिक्षण दिलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular