26.3 C
Ratnagiri
Monday, August 4, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeIndiaभारतामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे २ रुग्ण, सर्व राज्यात अलर्ट

भारतामध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटचे २ रुग्ण, सर्व राज्यात अलर्ट

ओमिक्रॉन व्हेरिएंटने भारतात शिरकाव केला आहे. कर्नाटकमध्ये या नवीन व्हेरिएंटचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. तर यातील एका रुग्णाच्या संपर्कातील पाच जण देखील कोरोना चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे कर्नाटकसह सर्व राज्ये अलर्ट झाली असून, केंद्र सरकारही या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कठोर पावले उचलताना दिसत आहे.

महाराष्ट्राच्या वेशीवर ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले आहेत. भारतात आढळल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी विमानतळ आणि बंदरे विभागातील आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अन्य दक्षता व तपासणी अधिकाऱ्यांशीही त्यांनी चर्चा केली व ओमिक्रॉनचा धोका अधोरेखित करत महत्त्वाच्या सूचना केल्या.

राज्यामध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले त्या कर्नाटक मध्येही नवीन कोविड नियमावली लागू करण्यात येईल. तज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे. हाय रिस्क देशांतून येणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष कडक नियम केले जातील,  असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड यांनी मागील पंधरा दिवसांत हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांची माहिती सर्व एयरलाइन्सकडे द्यावी. जेणेकरून या प्रवाशांच्या केलेल्या यात्रेसंबंधी माहिती पडताळणे एक प्रकारे सोपे होईल. या प्रकरणामध्ये जर प्रवाशांनी चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या विविध कलमांखाली त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार कोकणात येणार्‍या परदेशातील लोकांवरही बारीक नजर ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये अनेक जन परदेशातून जसे कि, सौदी, दुबई, मस्कत, कुवेतमधून ४६ लोक दाखल झाले आहेत. त्यांची आरटीपीसीआर चाचणी, कोरोना लशीचे दोन डोस घेतले आहेत का, याची तपासणी आरोग्य विभागाकडून केली जात आहे,  अशी माहिती जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी दिली. केवळ रत्नागिरी तालुक्यामध्ये सर्वाधिक १८ जण परदेशातून आले आहेत. त्यांची माहिती घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular