24.4 C
Ratnagiri
Wednesday, November 13, 2024

हरचिरी-उमरेत पकडली ७६ वानर-माकडे , आंबा बागायतदारांना दिलासा

गेल्या महिन्यात सुमारे ७० वानर माकडे पकडण्यात...

चिपळूणचे मटण, मच्छीमार्केट १८ वर्षे बंद

चिपळूण शहरातील मटण आणि मच्छीविक्रीचा प्रश्न गंभीर...

कोयना धरणातून यंदा उन्हाळ्यात पुरेशी वीजनिर्मिती

कोयना धरणातून यावर्षी पावसाळ्यात १८ टीएमसी पाणी...
HomeRatnagiriवातावरणातील बदलामुळे, जिल्ह्यात मच्छीमारी पूर्णपणे ठप्प

वातावरणातील बदलामुळे, जिल्ह्यात मच्छीमारी पूर्णपणे ठप्प

मागील आठवड्यापासून हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे, त्याचप्रमाणे संभाव्य वादळाच्या इशाऱ्याने मच्छीमार व्यावसायिकांनी आपल्या नौका किनाऱ्यावर आणून लावल्या आहेत. जिल्ह्यामधील मासेमारी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या दोन दिवसांपासून कोकण किनाऱ्यावर सतत पडणार्या अवकाळी पाऊसामुळे, त्यात भर म्हणून वाहणारे जोरदार वारे यामुळे वादळी वातावरण निर्माण झाले आहे.

आता हवामान खात्याने वादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे  पुन्हा एकदा मच्छीमारांची धावपळ उडाली. आणि नौका आंजर्ले, दाभोळ आणि जयगड खाडीमध्ये न्याव्या लागल्या आहेत. मच्छीचा व्यवसाय सुरु होऊन पंधरा दिवस पण झाले नसतील, तर पुन्हा मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे मासेमारी व्यवसायाला मोठा तडाखा बसला आहे. अशा वारंवार बदलणाऱ्या वातावरणामुळे मासळी खोल समुद्रात जात असल्याने मच्छीमारांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

आता डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा जवाद वादळाचा तडाखा कोकणाला बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे नुकत्याच मासेमारीकरिता आलेल्या सुमारे ५०० ते ६०० नौकांनी जवळपास असलेल्या खाडीचा आसरा घेतला आहे.

जयगड खाडी जवळ असलेल्यांनी जयगड तर दाभोळ जवळ मासेमारी करत असलेल्या नौकांनी दाभोळ तर हर्णे बंदरात आणि आंजर्ले जवळपास असलेल्या नौकांनी आंजर्ले खाडीत आसरा घेतला आहे. मुसळधार पाऊस वादळवारा होणार असा संदेश हवामान खात्याकडून मिळताच हर्णे बंदरातील नौकामालकांनी आपल्या नौका सुरक्षिततेसाठी आंजर्ले खाडीत नेल्या आहेत. पुढील चार दिवस सतत असच वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याकडून समजले असल्याने वातावरण नीट होईपर्यंत नौका खाडीतच राहतील असे येथील मच्छीमार बांधवांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular