23.5 C
Ratnagiri
Thursday, February 6, 2025

ना. नितेश राणे आता भाजपचे रत्नागिरी जिल्हा संपर्कमंत्री

राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री...

पुन्हा केवायसीचा कार्डधारकांमागे ससेमिरा, शिधापत्रिकाधारकांतून नाराजी

रेशनकार्ड आधार ई-केवायसी करून घेण्याच्या सूचना शासनाकडून...

पालू लघुपाटबंधारे योजनेला मंजुरी, किरण सामंत यांचा पुढाकार

उन्हाळ्यामध्ये टंचाईग्रस्त भागात पहिला टँकर सुरू कराव्या...
HomeMaharashtraसंपकरी एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची हाक – अनिल परब

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची हाक – अनिल परब

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी सोमवारपर्यंतची वेळ दिलेली. यामध्ये निलंबित करण्यात आलेल्या आणि निलंबनाची कारवाई नाही झालेल्या अशा सर्वांनाच बोलावण्यात आले आहे. विशेष म्हणजे, निलंबित झालेले जे कर्मचारी सोमवारपासून कामावर रुजू होतील त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येईल असेही परब यांनी जाहीर केले आहे.

वेतन वाढीसह काही मागण्या मान्य केल्यानंतरही आंदोलक कर्मचारी कामावर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे सरकारने आतापर्यंत एकूण १० हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. तर काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कोर्टाशिवाय हा प्रश्न सुटणार नाही असेही काहींच्या लक्षात आले आहे. मेस्माचा प्रस्ताव सुद्धा रद्द करण्यात आला. काहींनी आत्महत्या केल्या. पण या आत्महत्येमागे काही  वेगळी करणे देखील असू शकतात असे परब म्हणाले.

अनेकांनी आपण कामावर हजार झाल्यानंतर डेपोत प्रवेश दिला जात नाही अशा प्रकारच्या तक्रारी कानावर आल्या आहेत. जर कुणी तुम्हाला अडवत असेल तर त्याबाबत पोलिसांत तक्रार करा किंवा डेपो व्यवस्थापकासमोर तक्रार करा असे परब म्हणाले आहेत. कामावर रुजू होऊ नाही दिले तर पोलिस तक्रार द्या असे अनिल परब यांनी सांगत, शुक्रवारी पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या चर्चेनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी कर्मचाऱ्यांना शेवटची हाक दिली आहे.

आता सरकारने सोमवारपासून निलंबनाची कारवाई झालेल्या आणि नाही झालेल्या अशा सर्वांना कामावर येण्याचे आवाहन केले होते. ज्या ठिकाणी ५०% कर्मचारी संख्या पूर्ण होणार आहे तिथे काम पूर्ववत सुरू केले जाणार आहे. ज्या ठिकाणी ही संख्या कमी असेल, त्यांना दुसऱ्या डेपोत पाठवून कामाला सुरूवात करण्यात येईल. निलंबित कर्मचारी कामावर परतल्यास त्यांचे निलंबन रद्द करण्यात येणार असल्याने कर्मचार्यांना एका प्रकारे दिलासा मिळाला आहे. यानंतरही कुणी हजर होत नसेल तर मात्र त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular