24.8 C
Ratnagiri
Wednesday, October 15, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriबंदुकीच्या गोळीने मठ येथील २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

बंदुकीच्या गोळीने मठ येथील २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा मठ येथील एका तरुणाचा अनवधानाने बंदुकीची गोळी लागून मृत्यू ओढवला आहे. २० वर्षाच्या ओंकार बंडबे याचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गवताच्या पेंढ्याच्या उडवीमध्ये लपवून ठेवलेली बंदुक काढत असताना बंदुकीचा चाप ओढला जाऊन तालुक्यातील मठ बंडबेवाडी येथील २० वर्षीय तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे पोलीस तपासांअंती समोर आले आहे.

सिंगल बँरलची खचणीची बंदुक पेंढ्याच्या उडवीमध्ये लपवून ठेवलेली होती. ती बाहेर काढत असताना ओंकार याच्या हातून बंदुकीचा चाप अचानक ओढला जाऊन बंदुकीतून गोळी सुटली, आणि ती गोळी ओंकार याच्या थेट छातीमध्ये घुसल्यामुळे तो जोरात जमिनीवर कोसळला. अचानक झाडल्या गेलेल्या गोळीमुळे तो भयभीत सुद्धा झाला.

बंडबेवाडीमध्ये सुद्धा अचानक बंदुकीचा बार वाजल्याचा आवाज झाल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी नक्की कुठे काय झाले हे पाहण्यासाठी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ओंकार दिसला. परिसरातील नागरिकांनी ताबडतोब त्याला पाली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात  दाखल केले. परंतु, छातीत गोळी लागल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले.

ग्रामीण भागामध्ये डुक्कर किंवा इतर प्राण्यांच्या शिकारीसाठी अशा प्रकारच्या बंदुकींचा वापर केला जातो. या ऋतूमध्ये अनेक जण छोट्या मोठ्या शिकारीसाठी जंगलात जातात. त्यामुळे नक्की कशासाठी ओंकार हि बंदूक काढत होता याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही आहे. पण त्याच्या अचानक पणे जाण्याने सर्व गाव हळहळ व्यक्त करत आहे. गावामध्ये अतिशय नम्र, आपण आणि आपले काम भले अशा प्रवृत्तीच्या असणाऱ्या ओंकारची ओळख होती.

RELATED ARTICLES

Most Popular