काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यामध्ये ट्वीटर वॉर सुरू आहे. प्राण्यांची चित्रं ट्विटरवर पोस्ट करून दोन्ही नेत्यांनी एकमेकांची चेष्टा उडवताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार मिऱ्या प्रतिबंधक बंधाऱ्याच्या भूमिपुजनासाठी रत्नागिरीत आले असताना, त्यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना राणे-मलिक यांच्या ट्वीटर वादाबाबतही छेडण्यात आले असता अजित पवार यांनी आपल्या विशेष शैलीमध्ये नितेश राणेंना उत्तर दिले.
कोंबड्यांना मांजर केलं जात असल्याचं मी टीव्हीवर पाहत आहे. अशाने खरच कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का? कोकणाचा विकास होणार आहे का? विकासकामे करायची असतील तर राजकारण बाजूला ठेवावे, अस पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या हत्येचा कट रचला गेला असल्याचा दावा केला आहे. त्यावरही प्रतिक्रिया देत पवार म्हणाले कि, कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे आमचं काम आहे. मुंबईत गेल्यावर पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी मी या विषयावर चर्चा करणार आहे. माहिती मिळाली कि मी ती, सर्वांसमोर सांगेनच.
कोणत्याही व्यक्तीवर हल्ले होणार नाहीत याची काळजी घेणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे. परंतू, हल्ले करणं हे पूर्णत: चुकीचचं आहे. पण याबाबतची सर्व माहिती मला मिळाली को मग मी त्यावर बोलेन. हल्लेखोर कोणत्याही पक्षाचा असो, अशा प्रकारचे हल्लेखोर खरतर कोणत्याही पक्षाचे नसतात, कर्ण हि केवळ विकृती आहे. जे कोणी असेल त्यांच्यावर कडक कारवाई ही करूच, असं पवार म्हणाले.