26.7 C
Ratnagiri
Monday, October 14, 2024

iPhone 13 128GB च्या डिस्काउंट ऑफरने सर्वांना आनंद दिला…

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक...

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत...

‘भूलभुलैया ३’ मध्ये माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

विनोदी भयपटांच्या प्रवाहात यशस्वी ठरलेल्या 'भूलभुलैया' चित्रपट...
HomeInternationalड्रोन किलर मेजर वादिम बनले युक्रेनचे हिरो

ड्रोन किलर मेजर वादिम बनले युक्रेनचे हिरो

राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी वदिम यांना सन्मानित करण्याच्या घोषणेमध्ये सांगितले की, युक्रेनच्या अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे धैर्याने रक्षण केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो.

युक्रेनच्या युद्धात रशियाला पराभूत करण्यासाठी प्रसिद्ध मेजर वोरोशिलोव्ह यांना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी हिरो म्हणून घोषित केले आहे. रशियाच्या हवाई दलाला निर्भयपणे तोंड दिल्याबद्दल युक्रेननेही त्यांना ऑर्डर ऑफ द गोल्डन स्टारने सन्मानित केले आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी वदिम यांना सन्मानित करण्याच्या घोषणेमध्ये सांगितले की, युक्रेनच्या अखंडतेचे आणि सार्वभौमत्वाचे धैर्याने रक्षण केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. वदिम यांनी अत्यंत शौर्याने युक्रेनच्या लोकांची सेवा केली असल्याचेही ते म्हणाले.

ऑक्टोबर महिन्यात युक्रेनमध्ये वादिमचा एक सेल्फी व्हायरल झाला होता. त्यानंतर तो युक्रेनच्या लोकांमध्ये खूप प्रसिद्ध झाला. फोटोमध्ये तो रक्ताने माखलेला चेहरा घेऊन जळत्या मिग फायटर प्लेनमध्ये बसून सेल्फी घेताना दिसत होता. रिपोर्ट्सनुसार, त्याचा हा सेल्फी रशियासोबतच्या लढतीनंतर जखमी झाल्याचा होता. युद्धादरम्यान, त्याच्यावर रशियन बाजूने हल्ला झाला, त्यानंतर त्याच्या मिग विमानाला आग लागली आणि त्याच्या डोक्यालाही दुखापत झाली. अशा कठीण परिस्थितीतही थम्ब्स अप घेऊन सेल्फी काढत युक्रेनच्या लोकांनी त्याच्या धाडसाचे कौतुक केले होते.

कमी पगार आणि जास्त कामाचा बोजा यामुळे २०२१ मध्ये लष्करी करार वाढवण्यास नकार देणाऱ्या वैमानिकांमध्ये मेजर वादिम वोरोशिलोव्ह यांचा समावेश होता. खरं तर, गेल्या वर्षी, वादिमसह, युक्रेनने आणखी अनेक हवाई दलाच्या वैमानिकांना पाच वर्षांसाठी त्यांची सेवा वाढवण्याची संधी दिली होती. परंतु विविध कारणांमुळे वदिमने हे मान्य केले नाही. ही ऑफर नाकारताना वदिम म्हणाले होते की, जेव्हा जेव्हा विमान कोसळते तेव्हा सरकार नेहमीच वैमानिकांना दोष देते. त्यामागे काही तांत्रिक दोष असला तरी. इराणच्या ड्रोनच्या मदतीने युक्रेनचा ऊर्जा पुरवठा नष्ट करत असल्याचा आरोप रशियावर सातत्याने होत आहे. मेजर वदिम यांनी हे ड्रोन हाताळण्याची कला शिकली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular