28.8 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

रत्नागिरीत अमली पदार्थ बाळगणारे ७ जण अटकेत

शहराजवळील भाट्ये गावामध्ये गांजा बाळगणाऱ्या ५ तरुणांविरुद्ध...

रत्नागिरी पालिकेत ५५ कंत्राटींना डच्चू…

आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी पालिकेने आर्थिक शिस्त...

७२ तासानंतर महिलेचा मृतदेह सापडला, चर्चाना फुटलंय पेव

तब्बल ७२ तासांच्या प्रयत्नानंतर अखेर अश्विनी अहिरेचा...
HomeEntertainmentविकी आणि साराला शुटींगसाठी इंदूरचा फेरफटका पडला महागात, पोलिसांत तक्रार दाखल

विकी आणि साराला शुटींगसाठी इंदूरचा फेरफटका पडला महागात, पोलिसांत तक्रार दाखल

अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान नवीन पिक्चरच्या शुटिंगसाठी इंदूरच्या रस्त्यांवर बाईकवर फिरतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चर्चेत समोर आले आहेत.

एखाद्या चित्रपटाचे शुटींग सुरु असले तर अनेक प्रेक्षक आपापल्या आवडत्या कलाकाराच्या एका झलक साठी आतुरतेने वाट बघत असतात. हल्ली हिंदी , मराठी फिल्म इंडस्ट्रीचे विविध छोट्या मोठ्या शहरामध्ये शुटींग होत असतात. चित्रीकरणाच्या वेळी अनेक गमती जमती तर अनेक वेळा गंभीर प्रसंग सुद्धा घडतात.

अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान नवीन पिक्चरच्या शुटिंगसाठी इंदूरच्या रस्त्यांवर बाईकवर फिरतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ चर्चेत समोर आले आहेत. परंतु,  याच गोष्टीचा या दोघांच्या डोक्याला ताप झाला आहे. विकी आणि सारा एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी आले असताना या शहरात बाईकवर फिरत होते. मात्र, त्या बाईकच्या नंबर प्लेटमुळे सगळा घोळ झालायचे निदर्शनास आले असून,  त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देखील करण्यात आली आहे.

विकी ज्या बाईकवर साराला बसवून फिरवत होता त्याची नंबर प्लेट नेमकी त्या बाईकची नसून प्रत्यक्षात एका स्कूटरची होती. आणि हे फोटो आणि व्हिडियो पाहिल्यानंतर नंबरच्या खऱ्या मालकाने यासंदर्भात पोलिसांत तक्रार केली आहे. विकी आणि साराचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्कूटर मालक जयसिंह यादव हैराण झाले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे,  माझ्या एक्टिवाचा नंबर अभिनेत्यांनी शूटिंगसाठी वापरल्याची मला कल्पना देखील नव्हती.

२५ मे २०१८ रोजी मी एक स्कूटर घेतली होती. त्याला MP-09 UL 4872 हे नंबर मिळाले. त्याच नंबरचा वापर आता शूटिंगमध्ये करण्यात आला आहे. यावेळी एखादा अपघात घडला असता तर माझ्याविरुद्ध तक्रार दाखल झाली असती. त्याला कोण जबाबदार ठरले असते?” असा त्रस्त सवाल त्यांनी केला आहे.

इंदूरचे आरटीओ जितेंद्र रघुवंशी यांनी देखील दिलेल्या माहितीप्रमाणे,  अशा पद्धतीने नंबर प्लेटचा वापर करणे पूर्णत: चुकीचे आहे. एका वाहनाचा नंबर दुसऱ्या वाहनाला इच्छा असतानाही वापरता येत नाही तो कायद्याने गुन्हा ठरू शकतो. वाहन मालकाची मंजुरी असल्यावर सुद्धा हे बेकायदेशीरच मानले जाते. यासंदर्भात तपास केल्यानंतरच कारवाई केली जाईल.

RELATED ARTICLES

Most Popular