26.3 C
Ratnagiri
Saturday, August 2, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriनारळाच्या दुधापासून शुद्ध तेल काढण्याची सोप्पी पद्धत

नारळाच्या दुधापासून शुद्ध तेल काढण्याची सोप्पी पद्धत

भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रातील तज्ञांनी नारळाच्या दुधापासून शुद्ध तेल काढण्याची सोपी पद्धत शेतकर्‍यांसाठी अंमलात आणली आहे.

रत्नागिरीतील भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्राने कोकणातील शेतक‍ऱ्याना नारळ लागवडीमधून उत्पन्न कसे वाढवावे हे प्रात्यक्षिकासह दाखवून देण्याचे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे. उत्पन्न वाढविण्यासह,  रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात येणाऱ्या सोप्या उपायांवर संशोधन इथे सुरू आहे. मिश्रपिकांसह रोपवाटिकेमधून, याच नारळ केंद्राला दरवर्षी एक कोटी रुपयांचा महसूल शासनाला दिला जातो. अन्य संशोधन केंद्राच्या तुलनेत भाट्येमधून सर्वाधिक उत्पन्न मिळते.

भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रातील तज्ञांनी नारळाच्या दुधापासून शुद्ध तेल काढण्याची सोपी पद्धत शेतकर्‍यांसाठी अंमलात आणली आहे. माहिती संशोधन केंद्राचे डॉ. सुनील घवाळे यांनी जिल्ह्यामध्ये ही पद्धत उपयुक्त ठरली असून अनेकांनी या पद्धतीचा लाभ घेतला असल्याची माहिती दिली.

नारळ हे उष्ण कटीबंधीय हवामान असणार्‍या देशातील लोकांच्या नेहमीच्या आहाराचा एक अविभाज्य भाग आहे. संशोधन केंद्राचे डॉ. वैभव शिंदे, डॉ. एस. एम. वानखडे, डॉ. सुनिल घवाळे यांनी नारळापासून शुद्ध तेल काढण्याची शेतकर्‍यांसाठी सोपी पद्धत विकसित केली आहे. आणि यासाठी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षणही घेतले आहे.

कोकणात नारळ, आंबा , काजू यांची पिके ऋतूनुसार मोठ्या प्रमाणात येतात. अनेकांनी प्रशिक्षण काळामध्ये या सोप्या पद्धती शिकून घेऊन त्याचा फायदा करून घेण्याचे योजिले आहे. १९५७ सालापासून २७ जातींचा संग्रह येथे केला गेला आहे. या केंद्रात नारळ रोपांची विक्री सोबतच मसाला पिकांची कलमं तयार करून विकणे, अख्खे मसाला पदार्थ विक्री, गांडूळ खत विक्री,  नारळ बियाणे विक्री या देखील गोष्टी उपलब्ध असून त्यापासून देखील केंद्राला उत्पन्न मिळते.

RELATED ARTICLES

Most Popular