26.4 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...

स्मार्ट वीजमीटरचा निर्णय रद्द करायला लावू – लियाकत शाह

स्मार्ट वीजमीटर बसवल्यानंतर वाढीव वीजबिले येत असल्याच्या...
HomeLifestyleवयाच्या तिशीनंतर निरोगी आयुष्यासाठी कोणती योगासने करावी! जाणून घ्या

वयाच्या तिशीनंतर निरोगी आयुष्यासाठी कोणती योगासने करावी! जाणून घ्या

वयाची तिशी ओलांडल्यानंतर शारीरिक दृष्ट्या अनेक बदल घडून येतात.

आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी आपणच आपल्यावर केलेला कंट्रोल जीवनभरासाठी उपयुक्त ठरू शकतो. स्त्री असो वा पुरुष वयाची ३० वर्षेपर्यंत एकदम ताकदवान, कोणत्याही कामासाठी उत्सुक असे चित्र डोळ्यासमोर दिसते. पण वयाची तिशी ओलांडल्यानंतर शारीरिक दृष्ट्या अनेक बदल घडून येतात. वयाचा हा टप्पा ओलांडल्या नंतर शरीराची क्षमता थोडी मंदावत जाते त्यांमुळे त्यावेळी अतिरिक्त काळजी घेण्याची गरज लागते.

आणि चांगली काळजी घ्यायची असेल तर या सर्व जीवनचक्रामध्ये योगासनांची साथ असणे गरजेचे आहे. वयाच्या तिशीनंतर फिट राहायचे असेल तर ही योगासने करणे क्रमप्राप्त आहे.

सर्व व्याधींचा हळूहळू नाश करून निरोगी आयुष्य जगण्यासाठी सूर्यनमस्कार हे सर्वोत्तम आसन आहे. हे आसन शरीराच्या बहुतांश भागांवर सकारात्मकरित्या कार्य करते. हे आसन रोज केल्याने हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळते तसेच गुढगे आणि पायांच्या स्नायुंना बळकट करते.

दुसरा आहे ध्यानधारणा. मानसिक शांतता असेल तर शारीरिक निरोगी आरोग्य लाभते. यामुळे जीवनात  शिस्त आणि स्थिरता येते. यामुळे मनाला खूप शांती मिळते. हे करण्यासाठी, क्रॉस-पाय असलेल्या स्थितीत बसा. आता तुमचे तळवे गुडघ्यावर ठेवा आणि कंबर सरळ ठेवा आणि ध्यान करा.

तिसरे आहे वृक्षासन. वृक्षासन तुम्हाला केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही निरोगी बनवते. असे केल्याने अनेक शारीरिक समस्या दूर पळतात.

चौथं आहे अधो मुख स्वानासन. संपूर्ण शरीराला स्ट्रेच करण्यासाठी हे आसन केले जाते. संपूर्ण शरीराला आराम देण्यास हे आसन मदत करते. त्यामुळे हाताची ताकद वाढतेच आणि पाठीच्या कण्यासाठी देखील  ते फायदेशीर ठरते. या आसनामुळे संपूर्ण शरीरात ऊर्जा निर्माण होते.

पाचव आहे कपालभाती. वयाच्या ३० वर्षानंतर स्त्री आणि पुरुषांना अनेक शारीरिक व्याधीचा सामना करावा लागतो. बहुतेकांची समस्या हि वजन वाढण्याची आणि अवयव दुखीची असते. अशा स्थितीत कपालभाती  केल्याने वजन कमी होऊन, आटोक्यात राहण्यास मदत होते. चयापचय सुधारल्याने शारीरिक क्रियानं गती मिळते.

RELATED ARTICLES

Most Popular