27.4 C
Ratnagiri
Friday, August 1, 2025

महावितरण-नगरपालिका चिपळुणात आमने-सामने

महावितरण नगर परिषदेचे २०१० पासून मालमत्ता करस्वरूपात...

रत्नागिरीत भरदिवसा दोन फ्लॅट फोडले…

शहरात भरदिवसा चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडून...

तळेकांटे-तुरळ मार्गावर खड्ड्यांचा सापळा वाहनचालकांची कसरत

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तळेकांटे-संगमेश्वर-तुरळ हा प्रवास वाहनचालकांसाठी...
HomeRatnagiriमहसूल कार्यालयाकडून गणपतीपुळेत प्लास्टिक वापरकर्त्यांवर दंडात्मक कारवाई

महसूल कार्यालयाकडून गणपतीपुळेत प्लास्टिक वापरकर्त्यांवर दंडात्मक कारवाई

ही कारवाई महसूल विभाग व गणपतीपुळे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.

राज्यात सर्वत्र प्लास्टिक बंदी केली असताना सुद्धा अनेक विक्रेत्यांकडे प्लास्टिक पिशव्या दिसून येत आहेत. त्यावरून महसूल कार्यालय रत्नागिरीकडून दंडात्मक कारवाई करण्याचे धोरण हाती घेण्यात आले आहे. अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या कारवाया करण्यात येत आहेत.

रत्नागिरी तालुक्यातील तीर्थक्षेत्र व पर्यटन स्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील मंदिर परिसर व समुद्रकिनारी असलेल्या एकूण ११ व्यावसायिकांकडून बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर केल्या प्रकरणी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी प्रत्येकाकडून प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे एकूण पाच हजार पाचशे रुपयांची दंडात्मक वसुली महसूल विभागाकडून करण्यात आली. ही कारवाई महसूल विभाग व गणपतीपुळे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.

रत्नागिरी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्या निर्देशानुसार मालगुंडचे मंडलअधिकारी एस.एस.कांबळे, गणपतीपुळेच्या सरपंच कल्पना पक्ये, उपसरपंच महेश केदार,  तलाठी रोहित पाठक,  तंटामुक्ती अध्यक्ष महेश ठावरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली.

गणपतीपुळे हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असल्याने येथील मंदिर व समुद्रकिनारा परिसर कायम स्वच्छ आणि नीटनेटका असावा या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून सातत्याने स्वच्छता उपक्रम राबविला जातो. तसेच गणपतीपुळे येथील स्थानिक व्यवसायिक व व ग्रामपंचायती कडून ही नेहमीच स्वच्छता मोहीम राबवली जात असते. जेणेकरून पर्यटक पुन्हा पुन्हा या ठिकाणी येण्यासाठी उत्सुक असतील.

त्यासोबतच अलीकडे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही आता समुद्र किनारे स्वच्छतेच्या मोहिमेसाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. याच हेतूने येथील संपूर्ण परिसर स्वच्छ असावा या प्रमुख उद्देशाने स्थानिक व्यावसायिक व पर्यटकांना स्वच्छतेचे प्लास्टिकमुक्त वातावरणाचे महत्व महसूल विभागाकडून सांगण्यात आले. यावेळी व्यावसायिक व पर्यटकांनी कोणत्याही प्रकारे बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर साठा करू नये असे आवाहन करण्यात आले.

महसूल विभागाकडून प्लास्टिक बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे. स्वच्छतेचा थेट संबंध आरोग्याशी आणि सौंदर्यांशी येत असल्याने आपण सर्वांनी प्लास्टीक वापराच्या बंदीबाबत कायम जागृत राहून प्रशासनाच्या आव्हानाचे पालन करावे असे सांगण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular