27.9 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

कुंभार्ली घाटाचे सोनपात्र घाट असे नामांतर करण्याची सकल धनगर समाजाची मागणी

सोनबा धनगर बांधवाची आठवण सदैव टिकवून ठेवण्यासाठी...

‘अनारक्षित मेमू रेल्वे’ बाबत नाराजी कोकण विकास समिती

गणेशोत्सवासाठी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या दिवा चिपळूण आणि...

दाभिळ, उन्हवरे, पानवळेत बीएसएनएलचे ‘नो नेटवर्क’

दापोली तालुक्यातील गावतळे बाजारपेठेसह उन्हवरे, दाभिळ, पावनळ...
HomeMaharashtraआयएनएस रणवीर नौदलाच्या युद्धनौकेवर भीषण स्फोट, ३ जवान शहीद

आयएनएस रणवीर नौदलाच्या युद्धनौकेवर भीषण स्फोट, ३ जवान शहीद

२३ ऑक्टोबर २०२१ रोजी भारतीय नौदलाच्या INS रणविजयमध्ये देखील अशीच आगीची घटना घडली होती.

आयएनएस रणवीर या नौदलाच्या युद्धनौकेवर शक्तिशाली स्फोट झाल्याची दुर्घटना मंगळवारी मुंबईनजीक समुद्रामध्ये घडली. रणवीर  कुलाब्याच्या नौदल तळावर येत असतानाच हा स्फोट झाला.या स्फोटात तीन जवान शहीद झाले असून इतर ११ जण जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईतील नौदल रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून, सर्वांची प्रकृती स्थित असून, कुणाचीही प्रकृती गंभीर नसल्याचे सांगण्यात आले आहे.

आयएनएस रणवीर  ही युद्धनौका डिस्ट्रॉयर श्रेणीतील आहे. या युद्धनौकेच्या आतील भागात हा स्फोट झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून देण्यात आली. कोणत्याही स्फोटक शस्त्रांमुळे हा स्फोट झालेला नाही असेही स्पष्ट करण्यात आले आहे. स्फोटामागचे कारण शोधण्यासाठी नौदलाने याप्रकरणी तातडीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. नौकेवरील कर्मचारी स्फोटाच्या आवाजाने लगेचच सावध झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

युद्धनौकेत स्फोट झाल्यानंतर जे इतर क्रू मेंबर होते, ते बाहेर येणाच्या प्रयत्नात होते, मात्र याच प्रयत्ना दरम्यान तीन नौदल जवान शहीद झाले आहेत. स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नौदलाने या स्फोटाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आयएनएस रणवीर ईस्टर्न नेव्हल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते आणि ते लवकरच बेस पोर्टवर परतणार होते, त्यावेळी ही घटना घडल्याचे निदर्शनास आल्याचं, भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती दिली. आयएनएस रणवीरमध्ये झालेल्या स्फोटामधील मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता अर्तावली जात आहे. आजच्या या दुर्दैवी घटनेपूर्वी २३ ऑक्टोबर २०२१ रोजी भारतीय नौदलाच्या INS रणविजयमध्ये देखील अशीच आगीची घटना घडली होती. या घटनेमध्ये चार जण जखमी झाले.

RELATED ARTICLES

Most Popular