29.2 C
Ratnagiri
Sunday, August 3, 2025

रत्नागिरीतील मिरकरवाड्यात निघृण हत्त्या

शहरातील मिरकरवाडा खडप मोहल्ला येथे एका तरूणाचा...

मुहूर्ताच्या दिवशी पावसाचा खोडा केवळ २० टक्के नौका समुद्रात

शुक्रवारपासून मासेमारीवरील बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक...

“आम तो आम और गुटली का भी दाम” असा हा प्रकल्प : अनिकेत सुर्वे

"आता वाटद दशक्रोशीतील युवकांनी निर्धार केला आहे,...
HomeRatnagiriपेट्रोल पंपावरील कामगाराला किरकोळ कारणावरून मारहाण

पेट्रोल पंपावरील कामगाराला किरकोळ कारणावरून मारहाण

कामगार नीरज राजेंद्र मिश्रा वय २९, मूळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा.शिरगाव, रत्नागिरी याने २१ जानेवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील नजिकच्या शिरगाव येथील श्रद्धा पेट्रोल पंपावरील कामगाराला किरकोळ कारणातून ४ ते ५ अज्ञात स्वारांनी मारहाण केली. ही घटना मंगळवार दि. १८ जानेवारी रोजी सायंकाळी ७.२५ च्या दरम्यान घडली. याबाबत कामगार नीरज राजेंद्र मिश्रा वय २९, मूळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा.शिरगाव, रत्नागिरी याने २१ जानेवारी रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

मंगळवारी सायंकाळी दोघे जण दुचाकीवरून कॅनमध्ये ५० लिटर डिझेल भरण्यासाठी आले होते. एकूण ४ हजार ८०० रुपयांचे डिझेल भरून झाल्यानंतर, त्यांनी आपल्याकडील एटीएम कार्ड नीरजला पेमेंट करण्यासाठी स्वाईप करण्यास संगितले. तेव्हा नीरजने स्वाईप मशीन पलीकडे पेट्रोल पंपाच्या ऑफिसमध्ये असल्याचे सांगून, दोघांना पेमेंटसाठी तिथे येण्यास सांगितले. परंतु, याचा राग आल्याने त्या दोघांनी तसेच त्यांच्या इतर ३  ते ४  साथीदारांनी त्याला शिवीगाळ करायला सुरुवात केली. तर काहींनी मारहाण लाकडी दांडका आणि केबलच्या वायरच्या सहाय्याने त्याला मारायला सुरुवात केली.

दुसर्या बाजूला ऑफिसला पेमेंटसाठी येण्यासाठी सांगितल्यामुळे अज्ञात ४ ते ५ जणांनी मारहाण केल्याची फिर्याद आज २१ जानेवारी रोजी नीरज मिश्रा याने शहर पोलीस ठाण्यात दिली. नीरज यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बाजीराव कदम करत आहेत.

अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना वारंवार पहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी अरेरावी, मारहाण, हत्यारांचा धाक दाखवून, पैसे न देता पाळून जाणे अशा एक ना अनेक प्रकारच्या घटना घडत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular