27.9 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

मेरा ई-केवायसी अॅप टाळेल रेशनकार्ड रद्दची कारवाई

ई-केवायसी अपूर्ण असलेल्या जिल्ह्यातील ३ लाख ३...

तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी रत्नागिरीत बँक अधिकाऱ्यावर गुन्हा

'माझी मुलगी सुखप्रीत हिच्याशी जसमिक सिंग याने...
HomeEntertainmentबॉलीवूड अभिनेत्री प्रियांका आणि निकने दिली चाहत्याना "गुड न्यूज"

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका आणि निकने दिली चाहत्याना “गुड न्यूज”

शुक्रवारी रात्री १२ वाजता प्रियंकाने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास हे बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले कपल आहे. प्रियांकाने २ डिसेंबर २०१८ रोजी उदयपूर येथील उम्मेद भवन येथे निकसोबत हिंदू आणि ख्रिश्चन रिती रिवाजांनुसार लग्न केले. आता प्रियांकाने आपल्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज दिली आहे. बॉलिवूड आणि ग्लोबल अभिनेत्री प्रियांका चोप्रा सरोगसीच्या मदतीने आई बनण्याचा सुखद अनुभव घेतला आहे. शुक्रवारी रात्री १२ वाजता प्रियंकाने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

प्रियांकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की,  मी आणि निक आम्हाला दोघांना हे सांगताना आनंद होत आहे की, आम्ही आमचे कुटुंब वाढविण्याचा विचार केला असून, सरोगसीच्या माध्यमातून आमच्या आयुष्यात बाळाचे स्वागत करत आहोत. तेंव्हा आमच्या कुटुंबासाठी आम्ही तुम्हाला आदरपूर्वक विनंती करतो,  कृपया या विशेष काळात आमच्या गोपनीयतेची काळजी घ्या.

सरोगसीद्वारे निक-प्रियांका यांच्या घरी मुलगा किंवा मुलगी येणार असल्याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. गेल्या तीन महिन्यांमध्ये सरोगसीद्वारे आई बनलेली प्रियांका ही दुसरी बॉलिवूड अभिनेत्री आहे. यापूर्वी १७ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रीती झिंटा देखील सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म देऊन आई बनली होती. बॉलीवूड मध्ये अनेक अभिनेता आणि अभिनेत्रींनी सरोगासिच्या माध्यमातून मुल जन्माला घातले आहे. काही कलाकारांनी तर अविवाहित असून सुद्धा केवळ सरोगासिच्या आधारे सिंगल फादर किंवा मदर बनण्याचा अनुभव घेतला आहे.

लग्नानंतर प्रियांकाने तिचे इंस्टाग्राम अकाउंट बदलून प्रियांका चोप्रा जोनास केले. नुकतेच प्रियांकाने तिच्या नावातून जोनास आडनाव काढून टाकले होते,  त्यावरून त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या होत्या. परंतु, प्रियांका आणि तिच्या आईनेही त्यावर विशेष पोस्ट करून खुलासा केला होता की ती निकपासून वेगळी होत नाही आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular