फेब्रुवारी महिना हा प्रेमवीरांसाठी खासच असतो. कित्येक जण या महिन्याची आतुरतेने वाट बघत असतात. या महिन्याला कपल्स प्रेमाचा महिना असे देखील म्हणतात. कारण याच महिन्यात कुणाची प्रेम प्रकरण जुळतात तर कुणाची कायमची तुटतात.
फेब्रुवारीमध्ये येणाऱ्या व्हॅलेंटाइन डेच्या सेलिब्रेशनला आठवडाभर आधी सात तारखेपासून सुरुवात होते. चला तर मग जाणून घेऊया प्रेमाच्या महिन्याचे वेळापत्रक…
७ फेब्रुवारी पहिला दिवस रोझ डे – या दिवशी प्रेमी जोडपे एकमेकांना गुलाबाचे फुल देऊन, मनातल्या भावना एकमेकांना व्यक्त करतात.
८ फेब्रुवारी दुसरा दिवस प्रपोझ डे – या दिवशी आशिक आपल्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीला सांगतो.
९ फेब्रुवारी तिसरा दिवस चॉकलेट डे – त्यात जोडपे एकमेकांना चॉकलेट देऊन नात्यात गोडवा आणण्यासाठीचे प्रयत्न करत असतात.
१० फेब्रुवारी चौथा दिवस टेडी डे – या दिवशी कपल एकमेकांना टेडी बियर गिफ्ट करतात. मुलींना अशा प्रकारचे गिफ्ट खुपच जास्त आवडतात,
११ फेब्रुवारी पाचवा दिवस प्रॉमिस डे – जेव्हा तुम्ही एखाद्या सोबत रिलेशनशिप मध्ये असता किंवा कुणासोबत नवीन नाते जोडण्याचे प्रयत्न करता, ते रिलेशन टिकत केवळ खऱ्या वचनावर.
१२ फेब्रुवारी सहावा दिवस हग डे – काही वेळेला फक्त साथीची गरज असते जिथे शब्दांची आवश्यकता भासत नाही. प्रेमाने मारलेली एक मिठी कोणत्याही नात्यामध्ये नक्कीच जादू करते.
१३ फेब्रुवारी सातवा दिवस किस डे – शब्दांनी प्रेम व्यक्त करता येत नसले तरी, एका प्रेमळ चुंबनाने प्रियकर खूप काही सांगून टाकतो.
आठवडाभर मेहनत प्रेमात यशस्वी झालेले कपल्स आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे साजरा करतात.