26.5 C
Ratnagiri
Saturday, July 5, 2025

विजयदुर्ग’ वर पूल बांधून दोन जिल्हे जोडा…

तालुक्यातील कुंभवडे व सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी...

दाभोळ बंदराचा विकास करा – आ. शेखर निकम

दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८...

मोकाट गुरांचा दिवसाचा खर्च १० हजार – पालिकेला भुर्दंड

शहरातील मोकाट गुरांना पकडण्याची मोहीम पालिकेने हाती...
HomeRatnagiriरत्नागिरीमध्ये “सिनेमॅटोग्राफी शुट लाईक अ प्रो” वर्कशॉप संपन्न

रत्नागिरीमध्ये “सिनेमॅटोग्राफी शुट लाईक अ प्रो” वर्कशॉप संपन्न

कोळेकर सरांनी सिनेमॅटोग्राफी साठी लागणा-या कॅमेरा सेटींग, कॅमेरा ॲगल,गिंबल ऑपरेटिंग असे वेगवेगळे प्रकारचे लाईटचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले.

प्रत्येकाच्या आयुष्यात फोटोंचे महत्व अनन्य साधारण असते. त्यामुळे अगदी लहानपणापासून ते या क्षणापर्यंत विविध प्रकारचे फोटो आपण साठवून ठेवतो. पुढच्या पिढीला दाखविण्यासाठी अशा फोटो अथवा विडीयोंचा वापर केला जातो. काळ बदलत चालला असला तरी त्यानुसार नवीन आणि अद्यायावत गोष्टीसुद्धा बदलत जातात.

व्हिडीओग्राफर बदलत्या काळानुसार अपडेट रहावा आणि त्यांना चांगल्या दर्जाचे प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने रत्नागिरी तालुका फोटोग्राफर,व्हिडीओग्राफर असोसिएशनच्या वतीने २९, ३० जानेवारी या दोन दिवशी सिनेमॅटोग्राफी “शुट लाईक अ प्रो” हा वर्कशॉप घेण्यात आला. या वर्कशॉपमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून अक्षता फिल्मचे दिगंबर कोळेकर सर, किरण बामणे यांची उपस्थित लाभली.

या वर्कशॉपमध्ये मर्यादित जागा असल्यामुळे सुरुवातीला केवळ २१ फोटोग्राफर्सना या वर्कशॉपमध्ये सहभागी व्हायची संधी मिळाली. यामध्ये कोळेकर सरांनी सिनेमॅटोग्राफी साठी लागणा-या कॅमेरा सेटींग, कॅमेरा ॲगल,गिंबल ऑपरेटिंग असे वेगवेगळे प्रकारचे लाईटचा वापर कसा करावा याचे मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष मॉडेलसह प्रत्येक फोटोग्राफरला स्वतः च्या कॅमेरा वर शुटिंग करायला लावून त्यातील होणारे प्रत्यक्ष बदल अनुभवायला दिले व अद्ययावत मार्गदर्शन केले.

हा वर्कशॉप यशस्वी करण्यासाठी रत्नागिरी तालुका असोसिएशनचे सचिन सावंत,किरण खेडेकर, कांचन मालगुंडकर , गुरु चौगुले, श्वेता बेंद्रे, संदेश पवार,दिनेश भातडे, ज्ञानेश कांबळे, ओमकार धातकर व संपूर्ण तालुका असोसिएशनचे सभासद यांनी परिश्रम घेतले. यापुढे काळाची गरज बघून फोटोग्राफर प्रशिक्षणाने सम्रुध्द व्हावा यासाठी वेगवेगळ्या विषयांवर रत्नागिरी फोटोग्राफर-व्हिडीओग्राफर असोसिएशन वर्कशॉप घेणार असून जिल्ह्यातील फोटोग्राफरना त्याचा फायदा होणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular